कोरोनाशी लढा देता देता डॉक्टर धारातीर्थी, या देशातील 5000 वैद्यकीय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, 30 जणांचा मृत्यू

कोरोनाशी लढा देता देता डॉक्टर धारातीर्थी, या देशातील 5000 वैद्यकीय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, 30 जणांचा मृत्यू

सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रभाव इतका मोठा होता की डॉक्टरांकडे वैद्यकीय उपकरणे नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : जगभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढताना दिसून येत आहे. त्यातही इटलीत (Italy) सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा (Covid - 19) आघात इटलीवर झाला तेव्हा वैद्यकीय सेवा पुरेशी नव्हती. त्यामुळे वैद्यकीय सेवा देणाऱ्यांचा जीव गमवावा लागला.

कोरोनामुळे आतापर्यंत 5,000हून अधिक डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, रुग्णवाहिका कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. यामध्ये आतापर्यंत तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतेक लोक उत्तर भागातील असून येथे कोरोनाचा गंभीर परिणाम दिसून आला आहे. कारण या भागात अचानक मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले. सुरुवातीच्या काळात येथे डॉक्टरांकडे पुरेशी संरक्षक उपकरणे नव्हती, त्यामुळे कोरोनाचा प्रभाव झपाट्याने वाढू लागला.

संबंधित - BREAKING ब्रिटनला मोठा धक्का, पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

कोरोनाव्हायरसचा योग्यप्रकारे उपचार करण्यासाठी, डॉक्टर आणि वैद्यकीय तंत्रज्ञांना रूग्णांपासून होणाऱ्य़ा संसर्गापासून बचाव करण्यासाठी रुग्णांना क्वारंटाइन करुन उपचार देणे आवश्यक होते. मात्र येथे सुरुवातीलच्या काळात होणाऱ्या परिणामाकडे दुर्लक्ष केलं. आपात्कालिन परिस्थितीतील अनेक डॉक्टरांचा अशातच मृत्यू झाला..

मिलानच्या रूग्णालयातील डॉक्टर जिओवॅना यांनी सांगितले की “हा एक सततचा संघर्ष आहे.” “थकवा घेण्याचा विचार करण्यास वेळ नाही, कारण जेव्हा आपण कोविड -19 च्या रूग्णांकडे पाहतो आणि तेव्हा त्याजागी तुमची आई, वडील किंवा आजोबा असू शकतात. ते या आजाराशी एकटे कसे लढतील याची जाणीव होते. ”

संबंधित - सलाम! कोरोनाच्या संकटामध्ये स्वत: तोटा झेलून माफ केलं 100 दुकानांचं भाडं

इटलीतील एका डॉक्टरांनी सांगितले की, शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा अधिक धोकादायक आहे. ती म्हणाली, "आम्ही अशा परिस्थितीत काम करीत आहोत ज्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती." “परंतु जेव्हा तुम्ही कोविड – 19 चा रूग्ण पाहता तेव्हा भरुन येतं. त्या रुग्णांच्या मृत्यूसमयी त्यांच्याजवळही कोणी जाऊ शकत नाही. मृत्यूसमयी तो एकटा असतो. तेव्हा तुम्हाला स्वतःच्या थकव्याचा विसर पडतो.

First published: March 27, 2020, 5:26 PM IST

ताज्या बातम्या