न्यूयॉर्क, 27 मार्च : कोरोनाव्हायरसची भीती संपूर्ण जगात पसरली आहे. आहे. विशेषत: अमेरिकेत ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. येथे मृतांचा आकडा यापूर्वीच एक हजारांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, पेन्सिलेनियामधून कोरोनाची दहशत दाखवणारा एक धक्कादायक प्रकार घडला. येथील किराणा दुकानदाराने तब्बल 26 लाखांचे सामना फेकून याचं कारण ठरली एक महिला.
कोरोनामुळे अमेरिकेतही लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं अत्यावश्याक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. यातच एक महिला किराणा सामना घेण्यास गेली. मात्र सामना घेत असतानाच ती शिंकली. यामुळे या दुकानदाराला आपले सर्व सामना फेकून द्यावे लागले. सीएनएनच्या मते, ही महिला कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह तर नाही? अशी भीती दुकानदाराला होती.
पोलिसांनी केली महिलेला अटक
दुकानदाराच्या म्हणण्यानुसार या महिलेने स्टोअरमध्ये प्रवेश करताच शिंकायला सुरुवात केली. त्वरित दुकानाच्या मालकाने सर्व वस्तू फेकल्या. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने मुद्दाम असे केले. त्यामुळं या महिलेवर फौजदारी खटला चालविला जाईल. तर, ही महिला कोरोना पॉझिटिव्ह नसली तरी तीची चाचणी करण्यात येणार आहे.
अमेरिकेत मृतांचा आकडा वाढला
दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संखया अमेरिकेत 83 हजारांवर पोहचली आहे. चीनला मागे टाकून आता अमेरिकेत सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. तर, अमेरिकेत 1295 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, एकट्या न्यूयॉर्कमध्ये 50 हजारहून अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे अमेरिकेत सध्या चिंताजनक परिस्थिती आहे.
फिरायला गेले आणि अडकून बसले; पैसेही संपत आले, महिला पर्यटकांना कोसळलं रडू
कुशीत 3 महिन्याचं लेकरू आणि अजून आठवडाभर चालणं, डोळ्यांत अश्रू आणणारी कहाणी