न्यूयॉर्क 11 जुलै: कोरोना व्हायरसवर औषध निघालेलं नसलं तरी आता त्याच्याविषयी नवी माहिती समोर येत आहे. कोरोना व्हायरस हा फक्त श्वसन प्रक्रियेवरच हल्ला करतो अशी माहिती आत्तापर्यंत दिली जात होती. मात्र आता त्याविषयी नवी माहिती बाहेर आली आहे. लग्ज् बरोबरच कोरोनाव्हायरस हा किडनी, लिव्हर, हार्ट, मेंदू आणि तुमच्या नर्व्हस सिस्टिमवरही हल्ला करतो (kidneys, liver, heart, brain and nervous system) असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोना रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर हे नवे निष्कर्ष जाहीर केले आहेत. कोलंबिया विद्यापीठातल्या (Columbia University) हॉस्पिटलमध्ये गेली तीन महिने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. त्या अभ्यासानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
या व्हायरसने महत्त्वाच्या अवयवांवर हल्ला केला तर परिस्थिती आणखी बिकट होते. ज्या व्यक्तिंना इतर आजार आहेत त्यांना धोका जास्त असतो असं मतही डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, कोरोना महासाथीचा धोका देशभरात पसरत आहे. डिसेंबरपासून आतापर्यंत या विषाणूविषयी बरेच खुलासे समोर आले आहेत. मात्र अजूनही संभ्रमाची परिस्थिती कायम आहे. अमेरिका आणि युरोपच्या बर्याच देशांनी चीनवर योग्य वेळी विषाणूचा प्रादुर्भाव होण्याविषयी जागतिक समुदायाला माहिती दिली नसल्याचा आरोप केला जात आहे.
कोरोना महासाथीतील धक्कादायक अहवाल; देशातील 62 टक्के मुलांचं शिक्षण थांबलं
चीनने नेहमीच विविध आरोप नाकारले आहेत. विषाणूच्या गांभीर्याविषयी माहिती मिळताच त्याने त्वरित जागतिक आरोग्य संघटनेसह जागतिक आरोग्य संघटनेला याची माहिती दिल्याचा दावा चीनने केला आहे. पण आता हाँगकाँगच्या एका वायरोलॉजिस्टने चीनच्या या दाव्याबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे.
कोरोनावर आणखी एक औषध ठरतंय प्रभावी, भारताचं आहे हे कनेक्शन
हाँगकाँगमधून आपला जीव वाचवून अमेरिकेला पोहोचलेल्या एका वैज्ञानिकानं उघडकीस आणलं की चीनने कोरोनाव्हायरसविषयी जगाला सांगण्या फार पूर्वीच त्यांना माहित होते. हे देखील सरकारच्या उच्च स्तरावर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील व्हायरोलॉजी आणि इम्यूनोलॉजी तज्ज्ञ ली मेंग यान शुक्रवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.