कोरोना महासाथीतील धक्कादायक अहवाल; देशातील 62 टक्के मुलांचं शिक्षण थांबलं

कोरोना महासाथीतील धक्कादायक अहवाल; देशातील 62 टक्के मुलांचं शिक्षण थांबलं

कोरोनाच्या कहरामुळे आधीच लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जुलै : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यातच एका अहवालातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 15 राज्यांमधील 7235 कुटुंबांवरील रॅपिड नीड असेसमेंट सर्वेक्षणानुसार कोरोनाव्हायरस सर्व देशभर पसरण्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे 62% कुटुंबांतील मुलांनी शिक्षण घेणं सोडलं आहे. या अत्यावश्यक गरजांचे सर्वेक्षण सेव्ह द चिल्ड्रन या बाल-हक्कांसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेने केले आहे.

हे सर्वेक्षण 7 जून ते 30 जून 2020 दरम्यान करण्यात आले

या सर्वेक्षणात किमान 7235 कुटुंबे सहभागी झाली होती. या सर्वेक्षणात भारताच्या उत्तर भागातील 3827 कुटूंबाचा समावेश होता. तर या सर्वेक्षणात दक्षिणेकडील 556 गावांचा समावेश करण्यात आला. त्याच वेळी या सर्वेक्षणात पूर्वेकडील भागातील 1722 घरांचा समावेश होता, तर पश्चिम भागातील 1130 घरांचा या सर्वेक्षणात समावेश होता.

हे वाचा-क्रीडा विश्वाला मोठा झटका; इंग्लंडला वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या खेळाडूचं निधन

सर्वेक्षण केलेल्या कुटुंबांपैकी प्रत्येक 5 मुलांमध्ये 3 मुले अभ्यास थांबला

या सर्वेक्षणात असे आढळले आहे की प्रत्येक 5 पैकी तीन मुले / या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या सुमारे 62% कुटुंबांतील मुलांनी लॉकडाऊन दरम्यान शिक्षण घेणं थांबवलं आहे. या प्रकरणात सर्वात वाईट परिस्थिती उत्तर भारतातील होती, जेथे या काळात 64% मुलांनी शिक्षण घेणे थांबवले. त्याच वेळी, सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट स्थितीत आल्यानंतरही सुमारे अर्ध्या म्हणजेच 48% मुलांनी येथे शालेय शिक्षण थांबविले.

Published by: Meenal Gangurde
First published: July 11, 2020, 8:21 PM IST

ताज्या बातम्या