कोरोनावर आणखी एक औषध ठरतंय प्रभावी, भारताचं आहे हे कनेक्शन

कोरोनावर आणखी एक औषध ठरतंय प्रभावी, भारताचं आहे हे कनेक्शन

गेल्या 100 वर्षांपासून हे औषध वापरलं जातं. त्यामुळे त्या औषधांच्या परिणामांविषयी अतिशय विस्तृत माहिती उपलब्ध आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 11 जुलै: जगातल्या सगळ्याच देशांना जेरीस आणणाऱ्या कोरोना व्हायरसवर अजुन औषध सापडलेलं नाही. जगातले अनेक देश आणि दिग्गज औषध निर्मात्या कंपन्या त्यावर संशोधन करत आहेत. काही औषधांच्या मानवी चाचण्याही सुरू झाल्या आहेत. त्यात भारतातल्या दोन कंपन्याही आघाडीवर आहेत. कोरोनावर रामबाण औषध सापडलेलं नसलं तरी काही औषधं प्रभावी ठरत आहेत. TBवर वापरलं जाणारं  Bacillus Calmette Guerin (BCG) हे औषध प्रभावी ठरत असल्याचं काही संशोधनांमध्ये आढळून आलं आहे.

भारतात टीबीच्या रुग्णांचा प्रमाण मोठं आहे. सततच्या प्रभावी उपाय योजना करून आता देशात त्यावर नियंत्रण मिळवलं आहे. भारतात BCGची लस ही लहानपणीच दिली जाते. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी त्याचा उपयोग होत असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे या संशोधनाचा भारतातही कोरोनाविरुद्धच्या उपाचारांमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. CNNने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

जगातल्या अनेक देशांमध्ये BCGचा वापर केला जातो. गेल्या 100 वर्षांपासून हे औषध वापरलं जातं. त्यामुळे त्या औषधांच्या परिणामांविषयी अतिशय विस्तृत माहिती उपलब्ध आहे. कोरोनाच्या काही रुग्णांना ही लस दिल्यास त्याचा चांगला परिणाम युरोपसह काही देशांमध्ये आढळून आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनविरोधात एल्गार; व्यापार करारावर उचललं पाऊल

त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटनेनेही यावर अधिक संशोधन करून शिफारस केली पाहिजे असं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

हाँगकाँगमधून आपला जीव वाचवून अमेरिकेला पोहोचलेल्या एका वैज्ञानिकानं उघडकीस आणलं की चीनने कोरोनाव्हायरसविषयी जगाला सांगण्या फार पूर्वीच त्यांना माहित होते. हे देखील सरकारच्या उच्च स्तरावर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील व्हायरोलॉजी आणि इम्यूनोलॉजी तज्ज्ञ ली मेंग यान शुक्रवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

'या' 3 लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, असू शकतो कोरोना व्हायरस

ते म्हणाले की, साथीच्या सुरूवातीस या क्षेत्रातील अव्वल तज्ज्ञांनीही याकडे दुर्लक्ष केले. अन्यथा लोकांचे प्राण वाचू शकले असते.

यान म्हणते की, कोविड -19 चा अभ्यास करणार्‍या जगातील पहिल्या काही वैज्ञानिकांपैकी ती एक आहे. ती पुढे म्हणाले, "चीन सरकारने परदेशी आणि अगदी हाँगकाँग तज्ज्ञांना संशोधनात सामील होण्यास नकार दिला.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 11, 2020, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading