Home /News /videsh /

Coronavirus चा चीनला असा झाला फायदा, फोटो पाहाल तर विश्वासही नाही बसणार

Coronavirus चा चीनला असा झाला फायदा, फोटो पाहाल तर विश्वासही नाही बसणार

कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) चीनमधील प्रदूषण (Pollution) भरपूर प्रमाणात कमी झालं आहे. नासा (NASA) आणि युरोपियन स्पेस एजन्सीने (European Space Agency) सॅटेलाइट फोटो प्रसिद्ध केलेत.

  बीजिंग, 1 मार्च : कोरोनाव्हायरसने (Coronavirus) चीनमध्ये (China) थैमान घातलं आहे. याच कोरोनाव्हायरसमुळे चीनला एक फायदा झाला, तो म्हणजे चीनमधील प्रदूषण (Pollution) लक्षणीय प्रमाणात घटलं आहे. नासा (NASA) आणि युरोपियन स्पेस एजन्सी (European Space Agency) यांनी सॅटेलाइटच्या (Satellite) माध्यमातून चीनमधील नायट्रोजन डायऑक्साइडची (Nitrogen dioxide - NO ₂) पातळी तपासली आणि त्याचे फोटो प्रसिद्ध केलेत. हे फोटो पाहाल तर तुम्ही थक्कच व्हाल. तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही. Pic Credit - Nasa Eearth observatory
  Pic Credit - Nasa Eearth observatory
  वुहान (Wuhan) शहर आणि हुबेई प्रांतातील (hubei province) ही दृश्यं आहेत. जानेवारीच्या पहिल्या 3 आठवड्यात म्हणजे ज्यावेळी चीनमध्ये बंद नव्हता, त्यावेळी  बीजिंग आणि शांघाई शहरात भरपूर प्रमाणात नायट्रोजन डायऑक्साइड होतं. तर दुसरा फोटो हा फेब्रुवारीतील शेवटच्या 3 आवड्यातील आहे. जेव्हा वुहानसह हुबेई प्रांतातील इतर शहरांमध्ये पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता आणि या फोटोत नायट्रोजन डायऑक्साइड अजिबात दिसत नाही. संबंधित - बापरे ! कुत्र्यालाही झाला 'कोरोना', माणसांमार्फत प्राण्यांमध्ये पसरतोय व्हायरस चीनचे असे आणखी 6 फोटोही आहेत. ज्यामध्ये 2019 आणि 2020 मधील लुनार न्यू इयरच्या आधी, लुनार न्यू इयरच्या सेलिब्रेशनवेळी आणि त्यानंतर अशी तुलना करण्यात आली आहे. Pic Credit - Nasa Eearth observatory
  Pic Credit - Nasa Eearth observatory
  नासामधील शास्त्रज्ञ फी लियू यांच्या मते, इतक्या व्यापक क्षेत्रावर इतक्या प्रमाणात एका विशिष्ट कालावधीत प्रदूषणात घट झाल्याचं मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. गाड्या, पॉवर प्लांट्स यामधून नायट्रोजन डायऑक्साइड बाहेर पडतो. हा गॅस आपल्या आरोग्यासाठी खूपच हानीकारक आहे, फुफ्फुसावर याचा परिणाम होतो, अस्थमाचा धोका वाढतो. चीनमध्ये कोरोनाव्हायरस भरपूर प्रमाणात पसरत असल्याने सर्वत्र बंद आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे, कारखाने, कंपन्या बंद आहेत, लोकांनाही घराबाहेर पडण्यास परवानगी नसल्यानं खासगी गाड्याही रस्त्यावर उतरल्या नाहीत आणि त्याचाच हा परिणाम असल्याचं दिसतं आहे.  संबंधित - तुम्हीही असू शकता कोरोनाव्हायरसचे Super spreader! विषाणू वेगाने पसरायचं भयंकर कारण आलं पुढे
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: China, Coronavirus, Nasa

  पुढील बातम्या