भयंकर! देशात 24 तासांत 4 हजार 900 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह

भयंकर! देशात 24 तासांत 4 हजार 900 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह

आतापर्यंत 34, 109 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मत दिली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार 24 तासांत 4 हजार 987 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत देशभरात कोरोनाचा आकडा 90 हजार 927 वर पोहोचला आहे. त्यापैकी 53, 946 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंत 34, 109 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मत दिली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत 2 हजार 872 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व सामान्य नागरिकांपासून ते सैन्य दलापर्यंत कोरोना व्हायरसचा धोका आता सगळीकडे जाणवत असल्यानं प्रशासनाकडून वारंवार काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. आतापर्यंतची ही 24 तासांतील सर्वात मोठी वाढ असल्याची चर्चा आहे. 24 तासांत 4 हजार 900 हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

देशभरात कोरोनाचा सर्वात जास्त धोका गुजरात, महाराष्ट्रात आहे. राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 30 हजार 706 झाली आहे. आज 1606 नविन रुग्णांचे निदान झाले असून आज 524 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 7088 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 22 हजार 479 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 61 हजार 783 नमुन्यांपैकी 2 लाख 31 हजार 071 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 30 हजार 706 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 34 हजार 558 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 17 हजार 48 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हे वाचा-15 दिवसांनी वाढवला जाऊ शकतो Lockdown 4.0, अशी मिळू शकते सूट

हे वाचा-... आणि पायी चालत जात राहुल गांधी यांनी घेतली मजुरांची भेट

First published: May 17, 2020, 9:54 AM IST

ताज्या बातम्या