ब्रिटनला कोरोनाचा झटका, प्रिन्स चार्ल्स यांनाही व्हायरसचा विळखा

ब्रिटनला कोरोनाचा झटका, प्रिन्स चार्ल्स यांनाही व्हायरसचा विळखा

प्रिन्स चार्ल्स (prince charles) हे ब्रिटिश राजसत्तेच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.

  • Share this:

लंडन, 25 मार्च : ब्रिटनला (Britain) कोरोनाव्हायरने (coronavirus) मोठा धक्का दिला आहे. या व्हायरसने प्रिन्स चार्ल्स (prince charles)  यांनाही आपल्या विळख्यात घेतलं आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिजाबेथ यांचा मोठा मुलगा 71 वर्षांचे प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटिश राजसत्तेच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.

बकिंघम पॅलेसने जारी केलं आहे की, प्रिन्स ऑफ वेल्स कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसून नाही आलीत. मात्र आता त्यांची प्रकृती ठिक आहे. काही दिवस ते निवासस्थानाहूनच काम करतील.

हे वाचा - कोरोनाने जग धास्तावलेलं असतानाच ‘हंता व्हायरस’वर चीनने केला मोठा खुलासा

प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाव्हायरसचं निदान झाल्यानंतर त्यांच्या पत्नी डचेस ऑफ कॉर्नवाल एमिलिया यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली, मात्र त्यांची टेस्ट नेगेटिव्ह आली आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रिन्स आणि डचेस स्कॉटलंडमधील घरात सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये प्रिन्स चार्ल्स अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यामुळे त्यांना व्हायरसची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र त्यांना या व्हायरसची लागण नेमकी कुठून झाली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.

हे वाचा - Corona समोर ढाल बनून उभी महिला डॉक्टर, संपूर्ण देशाचं व्हायरसपासून केलं रक्षण

याआधी महाराणीच्या सहाय्यकालाही कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. बकिंघम पॅलेसमधील सहाय्यकाला कोरोनाव्हायरस झाला, त्यावेळी महाराणी एलिझाबेथ लंडनमधील निवासस्थानी होत्या. त्यानंतर त्यांना खबरदारी म्हणून गेल्या काही आठवड्यांपासून अमर्यादित काळासाठी विंडसर पॅलेजमध्ये पाठवण्यात आलं आहे, शिवाय त्यांचे ठरलेलं सर्व कार्यक्रम रद्द केले गेलेत.

First published: March 25, 2020, 5:09 PM IST

ताज्या बातम्या