बीजिंग 25 मार्च : कोरोनामुळे सर्व जग धास्तावलेलं असताना ‘हंता व्हायरस’च्या (hantavirus) बातमीमुळे सर्व जगाची पुन्हा एकदा झोप उडाली आहे. चीनच्या (China) युन्नान प्रांतात या व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरस हा चीनमधून आला आणि सर्व जगात पसरला. जगात या व्हायरसने 4 लाख 25 हजारांपेक्षा जास्त लोकांना ग्रासलं आहे. कोरोनाविरुद्ध सर्व जग लढत असताना हा नवा व्हायरस आल्याने आता पुढे काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र चीन सरकारच्या मालकीचं असलेल्या ग्लोबल टाईम्सने याबाबत खुलासा केला आहे. हंता व्हायरसमुळे एकाचा मृत्यू झाल्याचं ग्लोबल टाईम्सने मान्य केलंय. मात्र कोरोनासारखा हा व्हायरस श्वसनावाटे पसरणारा नाही. किंवा त्याची झपाट्याने लागणही होत नाही. हंता व्हायरस पेशंटच्या रक्त आणि लाळेच्या संपर्कात कुणी आलं असेल तरच त्याला त्याची बाधा होऊ शकते असं स्पष्टीकरण ग्लोबल टाईम्सने दिलं आहे. चीनच्या युन्नान प्रांतात हा व्हायरस आढळून आला आहे. उंदरांमध्ये हा व्हायरस सापडतो. त्याची लागण झाल्यावर ताप येणं, डोकं दुखणं, अंग दुखणं, उलटी, जुलाब होणं अशी लक्षणं दिसून येतात. वाचा - Corona समोर ढाल बनून उभी महिला डॉक्टर, संपूर्ण देशाचं व्हायरसपासून केलं रक्षण कोरोनाने महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही सोडले नाही आहे. अमेरिकेत आतापर्यंत 55 हजार 233 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यातील 797 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केवळ 379 लोकं बरी झाली आहे. त्यामुळं कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अमेरिकेतही लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं सध्या संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ठप्प पडली आहे.
Unlike #COVID19, #hantavirus is not mainly transmitted via respiratory system. But human excreta and blood of an infected #hantavirus patient can be contagious, virologist said after a Chinese worker died of the hantavirus. https://t.co/ozqjVWrylg pic.twitter.com/A7x4036nG1
— Global Times (@globaltimesnews) March 25, 2020
या सगळ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजब वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांच्या मते, “कोरोनामुळे लॉक डाऊन केल्यास लोकं घरात आत्महत्या करतील”, त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. वाचा- एक नंबर! तब्बल 1 लाख लोकांनी कोरोनावर केली मात, निरोगी होऊन परतले घरी कोरोनाबाबत माहिती देण्यासाठी ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली होती, यावेळी ट्रम्प यांनी, पहिल्यांदाच अमेरिकेची अर्थव्यवस्था एका आजारामुळे अडचणीत आली आहे. त्यामुळं अमेरिका बंद राहिल्यास लोक घरात आत्महत्या करतील, असे वक्तव्य केले. तसेच, ऐतिहासिक संकटात सापडले असताना, लोकांनी एकत्र येऊन लढा द्यावा, असे आवाहनही केले.