मराठी बातम्या /बातम्या /विदेश /COVID-19 : 'या' ब्लड ग्रुपला कोरोनाचा सर्वात जास्त धोका, डॉक्टरांचा नवा रिसर्च आला समोर

COVID-19 : 'या' ब्लड ग्रुपला कोरोनाचा सर्वात जास्त धोका, डॉक्टरांचा नवा रिसर्च आला समोर

यात सर्वात जास्त आशा ऑक्सफर्डने बनवलेल्या लशीपासून असून त्याच्या मानवी चाचण्यांनाही सुरूवात झाली आहे.

यात सर्वात जास्त आशा ऑक्सफर्डने बनवलेल्या लशीपासून असून त्याच्या मानवी चाचण्यांनाही सुरूवात झाली आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांना सामान्यत: श्वास घेण्यास त्रास होतो. या एका लक्षणामुळं सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे. एका नव्या रिसर्चनं असा दावा केला आहे की, श्वसनाचा त्रास जास्त किंवा कमी हा रुग्णांच्या रक्तगटावर आधारित असतो.

नवी दिल्ली, 05 जून : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) आतापर्यंत जगभरातील 66 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, या खतरनाक व्हायरसनं आतापर्यंत 3 लाख 89 हजार लोकांना जीव घेतला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना सामान्यत: श्वास घेण्यास त्रास होतो. या एका लक्षणामुळं सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे. एका नव्या रिसर्चनं असा दावा केला आहे की, श्वसनाचा त्रास जास्त किंवा कमी हा रुग्णांच्या रक्तगटावर आधारित असतो.

न्यूज मेडिकल लाइफ सायन्स वेबसाइटनं इटली आणि स्पेनमधील हॉटस्पॉट क्षेत्रातील 1600 रुग्णांचा अभ्यास केला. यातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, A पॉझिटिव्ह रुग्णांना श्वसनाचा त्रास जास्त होतो. तर O पॉझिटिव्ह रुग्णांना धोका कमी आहे. डॉक्टरांनी जीन्सच्या (genes) आधारे हा रिसर्च केला आहे. याच त्यांमा असे आढळून आले की A पॉझिटिव्ह रक्तगट असलेल्या रुग्णांचा श्वसनाच्या  त्रासामुळं जास्त मृत्यू झाला आहे.

वाचा-कोरोना रुग्णांनी संख्या थांबता थांबे ना, 24 तासांत समोर आली धक्कादायक आकडेवारी

रक्तगटांवरून केला रिसर्च

संशोधना दरम्यान, संशोधकांनी 2205 अशा रक्त नमुन्यांचे विश्लेषण केलं ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. दरम्यान रक्तगटाविषयी अधिक संशोधन चालू आहे. याआधी चीनच्या वुहान आणि शेन्झेन येथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या 2173 रुग्णांवर केलेल्या अभ्यासानुसार या रुग्णांमध्ये रक्तगट A असणाऱ्यांची संख्या जास्त आढळली आहे. O रक्तगटाच्या लोकांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका Aच्या तुलनेत खूपच कमी असल्याचं दिसून आलं आहे.

वाचा-भयंकर! खचाखच भरली मुंबईतील सर्व रुग्णालयं, नवीन रुग्णांसाठी जागाच नाही

कोरोना लसीचं ट्रायल सुरू

सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतीही लस तयार नाही आहे. 100 हून अधिक कंपन्या सध्या कोरोना लस तयार करत आहेत. पण आतापर्यंत कोणालाही यश मिळालेलं नाही. दरम्यान, दोन कंपन्यांनी चांगली बातमी दिली आहे आणि दावा केला आहे की सुरुवातीच्या काळात त्यांची लस प्रभावी असल्याचं सिद्ध होत आहे. अमेरिकेतील एका कंपनीची चाचणी दुसर्‍या फेरीपर्यंत पोहोचली आहे. तर चीनी कंपनी सिनोव्हॅक बायोटेक दावा करते की त्यांची लस 99 टक्के प्रभावी आहे. सध्या या लसांना अजून बरेच टप्पे पार करावे लागतील.

वाचा-मुंबईत धक्कादायक प्रकार, पैशांसाठी स्वॅब टेस्ट करून दिले बनावट कोरोना रिपोर्ट

First published:

Tags: Corona