कोरोना रुग्णांनी संख्या थांबता थांबे ना, गेल्या 24 तासांत समोर आली धक्कादायक आकडेवारी

कोरोना रुग्णांनी संख्या थांबता थांबे ना, गेल्या 24 तासांत समोर आली धक्कादायक आकडेवारी

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रूग्णांची संख्या 2,26,770 वर पोहोचली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 जून : देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात सुमारे दहा हजार नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. याशिवाय एकाच वेळी 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रूग्णांची संख्या 2,26,770 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 6348. लोक मरण पावले आहेत. गेल्या एका दिवसात 9851 प्रकरणं समोर आली आहेत.

महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू यासारख्या राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 77,793 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 41402 सक्रिय रूग्ण असून 33681 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 2710 लोकांचा मृत्यू झाला आहे. राजधानी दिल्लीत आतापर्यंत 25004 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 14456 सक्रिय रुग्ण आहेत. त्याच वेळी, 9898 लोक बरे झाले आहेत. याशिवाय 650 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

तामिळनाडूमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढून 27256 झाली आहे. यापैकी 12134 सक्रिय प्रकरणे असून 14902 लोक बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 220 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये कोरोनाचे 18584 रुग्ण आढळले आहेत आणि त्यामध्ये 4762 सक्रिय रूग्ण आहेत. याशिवाय राज्यात 1155 लोकांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशात आतापर्यंत कोरोनाचे 9237 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी 245 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 3553 सक्रिय रुग्ण आहेत. मध्य प्रदेशात कोरोनाची संख्या 8762 आहे, त्यापैकी 2748 सक्रिय प्रकरणे असून 5637 लोक बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 377 लोकांचा मृत्यू झाला आहे.

First published: June 5, 2020, 10:39 AM IST

ताज्या बातम्या