भयंकर! खचाखच भरली मुंबईतील सर्व रुग्णालयं, नवीन रुग्णांसाठी जागाच नाही

भयंकर! खचाखच भरली मुंबईतील सर्व रुग्णालयं, नवीन रुग्णांसाठी जागाच नाही

मुंबई हे कोरोनाचं नवं केंद्र झालं आहे. एकट्या मुंबईत आतापर्यंत 44 हजार 704 कोरोना रुग्ण आहेत.

  • Share this:

मुंबई, 05 जून : देशात कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वात जास्त रुग्णांची संख्या सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 75 हजारहून अधिक झाली आहे. तर मुंबई हे कोरोनाचं नवं केंद्र झालं आहे. एकट्या मुंबईत आतापर्यंत 44 हजार 704 कोरोना रुग्ण आहेत.

एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मुंबईमधील सर्व रुग्णालयं खचाखच भरली आहे. त्यामुळं नवीन रुग्णांना ठेवायचे कुठे, असा प्रश्न पालिकेसमोर आले. मुंबईतील रुग्णालयात 9092 बेडची व्यवस्था आहे, यातील 94% म्हणजेच 8570 बेड रुग्णांनी व्यापलेले आहेत. तर 98% ICU बेड व्यापलेले आहेत. सध्या मुंबईत 1097 ICU बेड आहेत, त्यातील केवळ आता 1 बेड शिल्लक आहे. कोव्हिड केअर बेडचीही अशीच परिस्थिती आहे. कोव्हिड केअरमधील 61% बेड भरलेले आहेत. 7107 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तर मुंबईतील रुग्णालयात 85% व्हेंटिलेटरवर रुग्ण आहेत तर 74% ऑक्सिझन बेड भरले आहेत.

वाचा-मुंबईत धक्कादायक प्रकार, पैशांसाठी स्वॅब टेस्ट करून दिले बनावट कोरोना रिपोर्ट

दुसरीकडे मुंबईत गुरुवारी 1442 नवीन रुग्ण आढळून आले. यासह मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 44 हजार 704 झाली आहे. तर, 48 लोकांचा 24 तासांत मृत्य़ू झाला. यासह मृतांची संख्या 1465 झाली आहे. मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सध्या 25 हजार 141 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात 75 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 75 हजारांवर गेला आहे. सध्या 39 हजार 944 सक्रिय रुग्ण आहेत. तर 32 हजार 329 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, देशात आतापर्यंत 2584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, वाढत्या आकड्यांबद्दल महत्त्वाची माहिती समोर

मुंबईपेक्षा दिल्लीत जास्त रुग्ण

गेल्या 24 तासांमध्ये मुंबईत 1276 नव्या रुग्णांची भर पडली तर दिल्लीमध्ये ही संख्या 1513 इतकी होती. गेल्या आठवड्यात दिल्लीत सातत्याने प्रतिदिन एक हजार रुग्णांची वाढ होत आहे. त्याआधी प्रतिदिन वाढ सुमारे 800रुग्णांपर्यंत मर्यादित होती. दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या 23 हजार 645 झाली असून त्यापैकी 9642 रुग्ण बरे झाले आहेत. खरंतर, आपण सर्वजण कोरोनाला कायमचं संपवण्यासाठी लढत आहोत. अशात मुंबई, काय आणि दिल्ली काय प्रत्येक शहरातून कोरोना नष्ट झाला पाहिजे. पण या बदलणाऱ्या आकड्यांमधून कुठे नियम कठोर केले पाहिजेत आणि कुठे शिथिलता द्यावी याची सरकारला मदत होणार आहे.

वाचा-मॉल, मंदिर आणि रेस्टॉरंटसाठी नवी नियमावली, 8 जूनपासून होणार अंमलबजावणी

First published: June 5, 2020, 10:15 AM IST

ताज्या बातम्या