बिल गेट्स यांना 5 वर्षांपूर्वीच दिसला ‘कोरोना’सारखा विषाणू; म्हणाले ‘या व्हायरसमुळे होईल कोट्यवधी लोकांचा मृत्यू’, पाहा VIDEO

बिल गेट्स यांना 5 वर्षांपूर्वीच दिसला ‘कोरोना’सारखा विषाणू; म्हणाले ‘या व्हायरसमुळे होईल कोट्यवधी लोकांचा मृत्यू’, पाहा VIDEO

'काही दशकात मिसाइल नव्हे तर मायक्रोब्ज तब्बल 1 कोटी लोकांच्या मृत्यूचं कारण ठरू शकेल', असं बिल गेट्स (Bill gates) 2015 सालीच म्हणाले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मार्च : महाभयंकर कोरोनाव्हायरसने (Coronavirus) जगभरात हजारो बळी घेतलेत, लाखोंना विळखा घातला. अद्यापही या व्हायरसवर उपचार सापडलेला नाही आणि सध्या जी परिस्थिती आहे, त्याची भविष्यवाणी बिल गेट्स (Bill gates) यांनी 5 वर्षांपूर्वीच केली होती.

जगभर कोरोनाव्हायरसच्या उद्रेकानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

2014 साली दक्षिण आफ्रिकेत एबोलाचा असा उद्रेक झाला होता. त्यानंतर 2015 साली टेड टॉकमध्ये (Ted talk) बिल गेट्स यांनी त्यावर चर्चा केली, त्याचवेळी त्यांनी भविष्यातील व्हायरसच्या धोक्याबाबत सावध केलं होतं.

बिल गेट्स म्हणाले होते, "पुढील काही दशकात युद्ध नव्हे तर असा व्हायरस 10 दशलक्ष लोकांचा जीव घेऊ शकेल, मिसाईल नाही तर मायक्रोब्स कोट्यवधी लोकांचा जीव घेईल. कारण आपण अशा महामारीवर मात करण्यासाठी तयारी केलेली नाही"

बिल गेट्स यांनी सांगितल्याप्रमाणेच कोरोनाव्हायरस कोणत्याही युद्धापेक्षा जास्त लोकांचा जीव घेतो आहे. अगदी बलाढ्य देशांचीही कंबर त्याने मोडली आहे.

हे वाचा - घाबरू नका, काळजी घ्या; भारत अद्यापही कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या टप्प्यात

जगभरात कोरोनाव्हायरसमुळे तब्बल 7,007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 1,75,536 लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. भारतात कोरोनाव्हायरसचे एकूण 126 रुग्ण आहेत, त्यापैकी सर्वाधिक 40 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी एक रुग्ण मुंबईतील आहे.

डिसेंबरमध्ये चीनच्या वुहानमध्ये या व्हायरसचा उद्रेक झाला. त्याठिकाणी सर्वात जास्त 3,213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर संपूर्ण जगभरात या व्हायरसने आपले हातपाय पसरले. शंभरहून अधिक देशांना या व्हायरसने विळखा घातला आहे. चीननंतर या व्हायरसचा सर्वात जास्त प्रभाव जर कोणत्या देशावर झाला तर तो देश म्हणजे इटली. इटलीमध्ये 3,213 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 28,000 प्रकरणं आहेत.

हे वाचा - FACT CHECK - उकाडा वाढल्यानंतर महाभयंकर कोरोनाव्हायरसचा नाश होणार?

First published: March 17, 2020, 8:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading