नवी दिल्ली, 17 : कोरोनाव्हायरसने (Coronavirus) जगभर थैमान घातलं आहे, प्रत्येक देश कोरोनाव्हायरसवर आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे. कुणालाही नको असलेल्या उन्हाळ्याची प्रतीक्षा आता प्रत्येक जण करतो आहे, कारण गरमीत (hot climate) महाभयंकर कोरोनाव्हायरस टिकणार नाही, अशी आशा सर्वांना आहे. मात्र खरंच गरमीमध्ये कोरोनाव्हायरसचा नाश होईल का? कोरोनाव्हायरसचा प्रसार झालेल्या देशांचा विचार करता, दक्षिण पूर्व देशांमध्ये कोरोनाव्हायरसची प्रकरणं वाढत आहेत, जिथं दमट आणि गरम हवामान आहे.
- फिलीपाइन्समध्ये आठवडाभरात कोरोनाव्हारस रुग्णांच्या मृत्यूची संख्या दुप्पट झाली आहे, रुग्णांचं प्रमाणही वाढतं आहे. त्यानंतर राजधानी मनीलामध्ये community quarantine लागू करण्यात आला आहे.
- मलेशियातही एका दिवसात 125 जणांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. कोरोनाव्हायरसचे एकूण 553 रुग्ण आहेत.
- थायलंडमध्येही कोरोनाव्हायरस रुग्णांचं वाढतं प्रमाण पाहता शाळा, सिनेमागृह, थिएटर, बार आणि अशी अनेक ठिकाणं जिथं गर्दी असते, अशी बंद करण्यात आलीत.
- इंडोनेशियामध्ये सोमवारी कोरोनाव्हायरसची नवीन 17 प्रकरणं आहेत. मात्र लोकसंख्येच्य बाबतीत चौथ्या क्रमांकावर असल्याने इथं रुग्णांची संख्या जास्त असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे
- सिंगापूरनेही खबरदारी म्हणून आयसोलेशन आणि क्वारंटाइन सुरू केलं आहे.
हे वाचा - ‘कोरोना’वर उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही व्हायरस, आणखी काही डॉक्टरांचा जीव धोक्यात दक्षिण पूर्व देशांमध्ये थंड देशांच्या तुलनेत सुरुवातीला कोरोनाव्हायरसचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे गरम वातावरणात कोरोनाव्हायरस टिकू शकत नाही, असं मानण्यात आलं आणि अमेरिका, युरोपियन देशांमध्येही तापमान वाढल्यानंतर कोरोनाचा कहर कमी होईल, असा विचार केला गेला. मात्र आता दक्षिण पूर्व देशांमध्येही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तापमानाचा या व्हायरसवर काहीही परिणाम होत नाही, हे दिसून येतं आहे. कोरोनाव्हायरस या गरम आणि थंड कोणत्याही वातावरणात जगू शकतो, असं जागतिक आरोग्य संघटनेनंही (WHO) स्पष्ट केलं आहे.
We answer more rumours and myths about the 2019 novel #coronavirus.
— World Health Organization Philippines (@WHOPhilippines) February 8, 2020
Q: Can the new coronavirus (2019-nCoV) survive in hot and humid climates?
A: Yes, 2019-nCoV has spread to countries with both hot and humid climates, as well as cold and dry. pic.twitter.com/W2hIkPusin
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनीही सांगितलं की, गरमीत कोरोनाव्हायरसचा नाश होईल, असे काही पुरावे मिळालेले नाहीत. WHO शी संबंधित Global Outbreak Alert चे चेअरपर्सन डेल फिशर यांच्या मते, ‘तापमान वाढल्याने व्हायरस कमी होईल मात्र त्याचा पूर्णपणे नाश होईल, असं वाटत नाही. त्यामुळे वातावरणापेक्षा आयसोलेटवरच जास्त भर द्यावा’ हे वाचा - कोरोनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी होम क्वारंटाइन; जाणून घ्या काय करावं, काय नाही सुरुवातीला कोविड-19 ला फ्लू समजण्यात आलं. मात्र नंतर हा फ्लूपेक्षाही जास्त धोकादायक असल्याचं समजलं, ज्यावर अजूनही उपचार सापडले नाहीत. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ अलर्जी अँड इन्फेक्शन डिसीज चे डायरेक्टर डॉ. अँथेनी फॉसी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, फ्लू 0.1% लोकांचा जीव घेतो, तिथं कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर 2% आहे. याचा अर्थ हा सामान्य फ्लू नाही. त्यामुळे सामान्य फ्लूप्रमाणे कोविड-19 चाही गरमीत नाश होईल, यावर प्रश्नचिन्हच आहे. कोरोनाव्हायरस अजूनही एक रहस्य आहे. त्यामुळे गरमीची प्रतीक्षा करण्यापेक्षा स्वतला सुरक्षा द्या, असं आवाहन शास्त्रज्ञांनी केलं आहे.