Coronavirus : जगाला 'कोरोना'चा इशारा देणाऱ्या डॉक्टरचाच व्हायरसनं घेतला बळी

Coronavirus : जगाला 'कोरोना'चा इशारा देणाऱ्या डॉक्टरचाच व्हायरसनं घेतला बळी

ज्या डॉक्टरने जगाला सर्वात पहिल्यांदा कोरोना व्हायरसच्या संभाव्य प्रकोपाबद्दल सावध केलं होतं. त्यांनाच कोरोना व्हायरनं आपली शिकार बनवलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी: चीनमधून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलंय. भारतासह जगभरातील डझनभर देशात कोरोना पसरला असून आत्तापर्यंत 563 जणांचा या व्हायरसनं जीव घेतलाय. तर 28 हजारांपेक्षा जास्त लोकांना व्हायरसची बाधा झालीय. भारतातही तीन रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. त्यातच ज्या डॉक्टरने जगाला सर्वात पहिल्यांदा कोरोना व्हायरसच्या संभाव्य प्रकोपाबद्दल सावध केलं होतं. त्यांनाच कोरोना व्हायरनं आपली शिकार बनवलं. चीनी डॉक्टर ली वेनलियांग यांनी स्थानिक प्रशासनाला कोरोनाच्या प्रादुर्भावाबद्दल इशारा दिला होता. पण त्यांच्या इशारा इशारा कुणी गांभीर्यानं घेतला नाही. स्थानिक पोलिसांनी तर त्यांना फटकारलं. पण गुरुवारी  वुहानमध्ये डॉक्‍टर ली वेनलियांग यांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला.

डॉक्‍टर ली  यांनी गेल्या वर्षी 30 डिसेंबरला कोरोना व्हायरसबद्दल जगाला सावध केलं होतं. त्यांनी त्यांच्या मेडिकल स्कूलच्या ऑनलाईन एम्‍युमनी चैट ग्रुपवर हॉस्पिटलमध्ये सात पेशंट दाखल झालेत ज्यांना

सार्ससारख्या रोगाची लक्षण आहेत. लीनं हेही सांगितलं की चीनमध्ये कोरोना व्हायरसची पाळमुळं ही खूप जुनी आहेत. 2003 मध्येही या व्हायरनं शेकडो लोकांचे जीव घेतले होते.

चीनमध्ये 19 परदेशी नागरिकांना कोरोनाची लागण- विदेश मंत्रालय

चीननं गुरुवारी स्पष्ट केलं की चीमध्ये राहाणाऱ्या 19 विदेशी नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झालीय. पण त्यांनी नागरिकांच्या देशाचा उल्लेख केलेला नाही. चीनच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत 563 जणांचा मृत्यू झालाय. तर एकूण 28,018 लोकांना व्हायरसची लागण झालीय. धक्कादायक बाब म्हणजे बुधवारी एका दिवसात 73 लोकांचा जीव गेला आहे.

भारतानं नागरिकांना बाहेर काढलं

कोरोनाचा प्रकोप झालेल्या चीनमधील वुहान प्रांतातून भारतासह जगातील अनेक देशांनी आपल्या नागरिकांना बाहेर काढलंय. आत्तापर्यंत 647 भारतीयांना सरकारनं बाहेर काढलंय तर मालदीवच्या सात नागरिकांना हवाई मार्गानं बाहेर काढण्यात यश आलंय. 10 भारतीय तीव्र तापामुळे विमानात चढू शकले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 6, 2020 09:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading