न्यूयॉर्क, 28 मार्च : कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांच्या संपर्कात येणारे डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी हॅझमॅट सूट घालणं आवश्यक अतो. हा स्पेस सूटसारखा दिसणारा विशेष असा ड्रेस आहे. मात्र भारतात अनेक डॉक्टरांना असे सूट मिळत नसल्याचा म्हटलं जातं आहे. त्यामुळे डॉक्टर फक्त मास्क आणि अॅप्रन घालत आहे. ही परिस्थिती फक्त भारताचीच नाही, तर अमेरिकेसारख्या देशाचीही आहे. सोशल मीडियावर शेअर करत करण्यात आलेला हा फोटो पाहिल्यानंतर अंदाज येईल की अमेरिकेसारख्या देशातही वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. न्यूयॉर्कमध्ये एका रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने हा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. माऊंट सिनाइ हॉस्पिटलमधील ही परिस्थिती आहे. या फोटोत नर्सने काळ्या रंगाच्या पिशव्या घातलेल्या दिसत आहेत. या काळ्या रंगाच्या पिशव्या म्हणजे डस्ट बिन बॅग, ट्रॅश बॅग किंवा कचऱ्याच्या पिशव्या म्हटलं जातं. हे वाचा - ‘सॉरी! काही लोक मरणारच, पण म्हणून देश बंद करायचा का?’ डायना टोरेस या फेसबुक युझरने हा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. आणि म्हटलं आहे, ‘संपूर्ण रुग्णालयात आता गाऊन्स नाहीत. तसंच नवी मास्क नसल्याने डिस्पोजेबल मास्क पुन्हा वापरायला दिले जात आहेत’, असा आरोपही करण्यात आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माऊंट सिनाइ हेल्थ सिस्टमचे सिनीअर डायरेक्टर ऑफ मीडियाचे लुसिया ली यांनी Today.com ला सांगितलं, माऊंट सिनाइच्या कर्मचारी आणि रुग्णांचे सुरक्षा ही आमची प्राधान्यता आहे. तर रुग्णालयाचे डायरेक्टर ऑप मीडिया रेनॅट ब्रोडस्काय यांनी NBC न्यूजला सांगितलं की, ‘रुग्णालयाकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साधनं आहेत, आजारापासून संरक्षण करण्यासाठी नर्स ट्रॅश बॅग वापरतात यामध्ये सत्यता नाही. हा आरोप खोटा आहे’ हे वाचा - सावधान! महाराष्ट्रात वृद्धांपेक्षा तरुणांना Coronavirus बनवतोय आपला शिकार जगभरात कोरोनाव्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकी कर्मचारी या रुग्णांना वाचवण्यासाठी झटत आहेत. मात्र या डॉक्टरांचा जीव धोक्यात आहे, रुग्णांवर उपचार करताना त्यांना स्वत:च्या संरक्षणासाठी मात्र आवश्यक साधनसामुग्री मिळत नाहीये. कोरोनाव्हायरस रुग्णांसाठी झटणारेच व्हायरसच्या विळख्यात सापडलेत. इटलीमध्ये 5000 हून अधिक डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, अॅंबुलन्स ड्रायव्हर यांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यातल्या 41 जणांचे बळी गेलेत, असं ‘द गार्डियन’ने सांगितलं आहे. स्पेनमधल्या एकूण 40,000 कोरोनाबाधितांपैकी 5,400 आरोग्य कर्मचारी आहेत, म्हणजेच एकूण रुग्णांच्या 14 टक्के प्रमाणात आरोग्य कर्मचारी आहेत, असं ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने लिहिलंय. अमेरिकेतही परिस्थिती वेगळी नाहीये. तिथे तर जॉन हॉपकिन इंस्टिट्यूटच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली. फिलाडेल्फिया चिल्ड्रन हॉस्पिटलच्या ट्रॉमा अॅंड एमरजन्सी विभागाच्या प्रमुखांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे ते युनिटच बंद करावं लागलं आहे, असं CNNने सांगितलं. हे वाचा - ‘आधी भारतातलं पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं नंतर दिला बाळाला जन्म’ हा आजार इतक्या सहज पसरतो की त्यामुळे डॉक्टरांना आता जोखीम पत्करावी लागू शकते. म्हणूनच केंद्र सरकारनं आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतची विमा संरक्षण जाहीर केलं. यासाठी तीन महिन्यांचा प्रिमियम सरकारतर्फे दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्यामध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीची साधनंविकत घेण्याची तरतूद आहे. कोव्हिड रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी हॅझमॅट सूट घालणं आवश्यक असतं. हा सूट अगदी स्पेस सूटसारखा दिसतो. हे वाचा - भारतीय रेल्वेनंही सुरू केलं आयसोलेशन वॉर्ड, पाहा एक्स्प्रेसमधील INSIDE PHOTO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.