Home /News /pune /

'आधी भारतातलं पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं नंतर दिला बाळाला जन्म'; पुण्याच्या महिला डॉक्टरला सलाम

'आधी भारतातलं पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं नंतर दिला बाळाला जन्म'; पुण्याच्या महिला डॉक्टरला सलाम

आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला असं म्हणत आव्हाडांनी मिनल भोसले यांच्या कामाचं कौतूक केलं आहे.

    मुंबई, 28 मार्च : प्रसुतीसाठी अवघे काही दिवस उरले असतानाही आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट शोधण्याचा ध्यास घेतलेल्या आणि किटच्या जन्मानंतरच बाळाला जन्म देणाऱ्या पुण्याच्या विषाणूतज्ज्ञ मीनल दाखवे-भोसले यांचं सर्व स्तरावर कौतुक होत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मीनल यांच्या कामगिरीबद्दल ट्वीट केल्यानंतर या विषाणूतज्ज्ञांच्या कामाकडे लक्ष वेधलं गेलं. यलॅब या फार्माकंपनीत संशोधन आणि विकास विभागाच्या प्रमुख म्हणून मीनल भोसले काम करतात. त्यांच्या नेतृत्वाखालील टीमनेच भारतातील पहिल्या ‘कोरोना टेस्ट किट’चा शोध लावला आहे. मीनल यांच्या या कामगिरील सलाम करत आव्हाडांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणाले की, 'त्यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला.पुण्याच्या डॉ. मीनल दाखवे भोसले यांचे अनंत आभार. अशा कर्तव्यनिष्ठ माणसांसमोर मान आदराने झुकते.' पुण्यातल्या Mylab Discovery Solutions Pvt Ltd या कंपनीने कोरोना टेस्ट किट बनवली आहे. Molecular Diagnostics क्षेत्रात या कंपनीचं काम असून अशा विविध आजारांचं निदान करण्यासाठीच्या अनेक किट्स त्यांनी याआधी तयार केल्या आहेत. सध्या भारत जर्मनीमधून Covid-19 च्या टेस्ट किट मागवतो आहे. मात्र जगभरातूनच या किट्सला मागणी असल्याने त्या मिळविण्यात अडचणीही येतात. त्याबरोबर त्या काहीशा महागड्याही आहेत. ही स्वदेशी किट बाहेरच्या किट्सच्या मानाने स्वस्त असल्याची माहिती मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे रणजित देसाई यांनी दिली. "आम्ही एका आठवड्यात एक ते दीड लाख किट्स तयार करू शकतो. यांची किंमत विदेशी किटपेक्षा चौपटीने स्वस्त आहे." हे वाचा - लॉकडाऊन असतानाही काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या, खुनाचा LIVE VIDEO समोर WHO आणि इतर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ही किट तयार करण्यात आली आहे. त्याला देशातल्या FDA आणि Central Drugs Standard Control Organisation (CDSCO) आणि ICMR या संस्थांनीही मान्यता दिली आहे अशी माहिती कंपनीने दिली आहे. अतिशय विक्रमी कालावधीत ही किट तयार करण्यात आली असून सरकारच्या विविध संस्थांनीही त्याला अतिशय तत्परतेने मान्यता दिली अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल यांनी दिली. हे वाचा - खरेदीसाठी लोकांची तोबा गर्दी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा गोळीबार पुण्यातल्या या लॅबने तयार केलेली किट 80,000 रुपयांना आहे. एका किटमध्ये किमान 100 जणांची टेस्ट होऊ शकते. भारतात एक लाख लोकांमागे अतिशय कमी टेस्टिंग केलं जातं असल्याचंही म्हटलं जातं. आता स्वदेशी किट तयार झाल्याने त्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. सध्या जर्मनीच्या ज्या कंपनीकडून या किट आयात केल्या जातात त्यापेक्षा अतिशय कमी किंमतीत ही किट तयार झाली आहे. त्याच बरोबर त्याचा दर्जाही अतिशय उच्च क्षमतेचा आहे. सध्या कोरोनाची लागण झाल्यानंतर सात तासानंतरच टेस्टमध्ये आढळून येतं. या नव्या किटमध्ये लागण झाल्याच्या फक्त अडीच तासांमध्येच त्याचं निदान करता येणार आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या