मराठी बातम्या /बातम्या /देश /दक्षिण आफ्रिकेत COVID-19 चा आढळला नवा व्हेरिएंट, भारत सरकारनं जारी केले निर्देश

दक्षिण आफ्रिकेत COVID-19 चा आढळला नवा व्हेरिएंट, भारत सरकारनं जारी केले निर्देश

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना (Corona Virus) व्हायरसचा (New Variant) एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे.  यामुळे देशभरात 100 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना (Corona Virus) व्हायरसचा (New Variant) एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे. यामुळे देशभरात 100 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना (Corona Virus) व्हायरसचा (New Variant) एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे. यामुळे देशभरात 100 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोना (Corona Virus) व्हायरसचा (New Variant) एक नवीन व्हेरिएंट सापडला आहे. यामुळे देशभरात 100 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. हा व्हेरिएंट आढळून आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचं सरकार, खाजगी प्रयोगशाळांच्या सहकार्यानं, या व्हेरिएंटची लागण झालेल्या लोकांवर व्यापक संशोधन करत आहे. हा व्हेरिएंट किती धोकादायक आहे हे अद्याप कळलेलं नाही.

मात्र दक्षिण आफ्रिकेच्या द नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस (National Institute for Communicable Diseases)(NICD) च्या मते, ते संसर्गजन्य असू शकते. दरम्यान भारत सरकारच्या आरोग्य सचिवांनी निर्देश जारी केले आहेत. आरोग्य सचिवांनी भारतात येणार्‍या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची सखोल कोरोना तपासणी करण्यात यावी असे निर्देश जारी केलेत.

हेही वाचा- परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला, 6 तास कसून चौकशी; माजी आयुक्तांवर 5 गुन्हे दाखल

NICD नं सांगितलं की, या नवीन कोरोना व्हायरस व्हेरिएंटचं नाव B.1.1.529 आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सरकारनं NGS-SA सदस्य सरकारी प्रयोगशाळा आणि खाजगी प्रयोगशाळांना ताबडतोब जीनोम सिक्वेन्सिंग करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून हा व्हेरिएंट किती सांसर्गिक, किती घातक आहे हे कळू शकेल.

भारत सरकारनं सर्व राज्यांना दिले निर्देश

भारत सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची प्रकरणे वेगानं वाढत असल्याचे म्हटलं आहे. व्हिसा-संबंधित आणि देशांतर्गत सूट दिल्यास, यामुळे देशातील आरोग्य समस्या वाढू शकतात. त्यामुळे सर्व राज्यांनी बाहेरील देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी करावी.

केंद्र सरकारचे आरोग्य सचिव म्हणाले की, परदेशातून येणाऱ्या सर्वांचा मागोवा घ्यावा. जर कोणी दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना किंवा हाँगकाँगमधून आले असेल तर त्याची तपासणी करणं आवश्यक आहे. त्यांचे नमुने ताबडतोब INSOCAG जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावेत.

हेही वाचा-  मोठी बातमी ! विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर नाही तर मुंबईतच होणार

 NICD चे कार्यवाहक कार्यकारी संचालक प्रा. एड्रियन पुरेन म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेत नवीन व्हेरिएंट आढळल्यानं आम्हाला आश्चर्य वाटत नाही. सध्या डेटा खूपच मर्यादित असला तरी आमचे आरोग्य कर्मचारी आणि शास्त्रज्ञ सतत काम करत आहेत. या प्रकाराचा उगम कुठून झाला हे शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते कुठे पसरले आणि किती नुकसान होऊ शकते? आम्ही लोकांना सतत सल्ला आणि इशारे देत आहोत, जेणेकरून ते कोरोनाचा संसर्ग टाळू शकतील.

पब्लिक हेल्थ सव्‍‌र्हेलन्स अँड रिस्पॉन्सचे प्रमुख डॉ. मिशेल ग्रूम यांनी सांगितलं की, आश्‍चर्यकारक बाब म्हणजे पॉझिटिव्ह लोकांची संख्या आणि संसर्ग झालेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. B.1.1.529 या व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे गॉवटेंग (Gauteng), उत्तर पश्चिम (North West)आणि लिम्पोपो (Limpopo)येथे नोंदवली गेली आहेत. मिशेल म्हणाले की, आम्ही देशभरातील NICDसह सर्व राज्यांच्या आरोग्य प्रशासनाला सतर्क केले आहे.

हेही वाचा-  Nostradamus Predictions for 2022 : दुष्काळ, अणुबॉम्ब आणि उपासमार; नॉस्ट्राडॅमसची चिंता वाढवणारी भविष्यवाणी

 डॉ मिशेल ग्रूम यांनी सांगितलं की, आम्ही लोकांना जास्तीत जास्त संरक्षण ठेवण्यास सांगितलं आहे. कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करा. एखाद्यानं लस घेतली असली तरी त्यांनी मास्कचा वापर केला पाहिजे. सोशल डिस्टेंसिंगचं पालन करा. हाताच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. कारण आत्तापर्यंत आम्हाला माहित नाही की नवीन व्हेरिएंट किती धोकादायक आहे. याआधी डेल्टा व्हेरिएंटने जगात प्रचंड विध्वंस घडवून आणला होता.

WHO ने बोलावली उच्चस्तरीय बैठक

युरोपमध्ये वेगाने पसरणारा कोरोना आता दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि बोत्सवानामध्ये (Botswana) नव्या स्वरूपात समोर आला.यामुळे व्हायरसच्या नवीन म्यूटेंटने जगातील वैज्ञानिक आणि डब्ल्यूएचओ (WHO) चिंतेत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी वेगाने पसरणाऱ्या नवीन कोरोना व्हायरस व्हेरिएंटवर चर्चा केली.

याबद्दल, लंडनमधील UCL जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक François Balloux यांनी सायन्स मीडिया सेंटरने प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, b.1.1529 नावाच्या नवीन व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्‍यूटेशन होत आहेत. हा व्हेरिएंट उपचार न केलेल्या एचआयव्ही/एड्स रुग्णापासून विकसित झाला असावा असा अंदाज आहे. बॅलॉक्स म्हणाले की, तीव्र संसर्गादरम्यान हा विकसित होण्याची शक्यता असते. या टप्प्यावर संसर्ग किती पसरू शकतो याचा अंदाज लावणे कठीण आहे. काही काळ त्याचे बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण केले पाहिजे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus