कोरोना वॅस्किनची मानवी चाचणी, पहिल्यांदा लस टोचून घेणारी एलिसा काय म्हणाली?

कोरोना वॅस्किनची मानवी चाचणी, पहिल्यांदा लस टोचून घेणारी एलिसा काय म्हणाली?

कोरोनाच्या वॅक्सिनची मानवी चाचणी घेण्यासाठी 800 लोकांमधून एलिसा ग्रॅनेटोची निवड कऱण्यात आली. ह्युमन ट्रायलसाठी ती का तयार झाली या प्रश्नाचं उत्तरही तिने दिलं आहे.

  • Share this:

लंडन, 25 एप्रिल : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या लसीच्या मानवी चाचणीला शुक्रवारी सुरुवात झाली आहे. यासाठी एका मायक्रोबायोलॉजीस्टला कोरोनाची लस टोचण्यात आली. वॅक्सीनच्या मानवी चाचणीसाठी 800 लोकांमधून मायक्रोबायोलॉजिस्ट असलेल्या एलिसा ग्रॅनेटो हिची निवड कऱण्यात आली. हे वॅक्सिन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी तयार केलं आहे.

कोरोनावर मानवी लसीची चाचणी जिच्यावर घेण्यात येत आहे त्या एलिसाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. ही लस शरीरात प्रतिकार शक्ती वाढवेल आणि त्यामुळे कोरोनाशी लढण्यास मदत होईल. लस टोचण्यात आल्यानंतर एलिसा ग्रॅनेटोने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, मीसुद्धा एक वैज्ञानिक आहे. यासाठीच संशोधनाला सपोर्ट करायचा आहे. मी व्हायरसवर कोणताही अभ्यास केलेला नाही. यामुळं मला काहीसं वाईट वाटत होतं. पण या कामात सहकार्य करण्यासाठी हा सर्वात सोपा मार्ग आहे.

एलिसाने गुरुवारी ही लस टोचून घेतली. विशेष म्हणजे गुरुवारी तिचा 32 वा वाढदिवसही होता. एलिसासोबत कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या एडवर्ड ओनिललासुद्धा लस टोचली आहे. एलिसाला कोविड 19 ची लस टोचली आहे तर ओनिलला मेनिनजाइटिसची लस टोचली आहे. मेनिनजाइटिस हा सुद्धा एक संसर्गजन्य आजार आहे.

एलिसा आणि ओनिल यांना 48 तास देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यांच्यावर वॅक्सिनचा प्रभाव दिसल्यानंतर इतरांना लस टोचली जाईल. मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात 18 ते 55 वयाच्या निरोगी लोकांची निवड करण्यात आली आहे. यातील लोकांवर दोन्ही लसींची चाचणी करण्यात येईल. मात्र त्यांना सांगण्यात येणार नाही की त्यांना कोणती लस टोचण्यात आली आहे.

हे वाचा : कोरोनाच्या संकटातही अमेरिकेत भारतीय मुलीने फुलवलं अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य

संशोधकांच्या टीमचे प्रमुख आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये वॅक्सिनॉलॉजीचे प्राध्यापक सारा गिलबर्ट यांनी सांगितलं की, मला या लसीबाबत पूर्ण विश्वास आहे. आम्हाला याची मानवावर चाचणी घ्यायची आहे यात शंका नाही आणि डेटा गोळा करायचा आहे. मात्र आम्हाला हे दाखवायचं आहे की हे वॅक्सिन लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचवतं.

हे वाचा : 'आम्हाला भाकरीची किंमत माहिती आहे', गरीबांच्या पोटासाठी भावांनी विकली जमीन

संकलन, संपादन - सूरज यादव

First published: April 25, 2020, 7:33 AM IST

ताज्या बातम्या