Home /News /national /

'आम्हाला भाकरीची किंमत माहिती आहे', गरीबांच्या पोटासाठी भावांनी विकली स्वत:ची जमीन

'आम्हाला भाकरीची किंमत माहिती आहे', गरीबांच्या पोटासाठी भावांनी विकली स्वत:ची जमीन

लॉकडाऊनमुळे दोन वेळचं जेवण न मिळणाऱ्या लोकांना अन्न देण्यासाठी दोन भावांनी जमीन विकली. त्यानंतर जवळपास 12 हजार लोकांना त्यांनी मदत केली.

    बेंगळुरू, 23 एप्रिल : लॉकडाऊन सुरू होऊन एक महिना होत आला. या लॉक़डाऊनमुळे हातावर पोट असलेल्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. जगभर पसरलेल्या कोरोनामुळे जगणं कठीण झालं आहे. लॉकडाऊनमुळे मजुरांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या हाताला ना काम आहे ना दोन वेळचं जेवण खायला पैसे. अशा मजुरांसाठी, गरीबांसाठी काही लोक पुढं येत आहेत. कर्नाटकात कोलार शहरात तजामुल आणि मुजम्मिल पाशा या दोन भावांनी गरीबांना जेवण देण्यासाठी स्वत:ची जमीन विकली. भावा भावांनी जमीन विकून 25 लाख रुपये उभा केले. त्यानंतर एका नेटवर्कच्या मदतीने धान्य आणि भाज्या एकत्र केल्या. त्यानंतर धान्याची पाकिटं तयार केली. ज्यामध्ये दहा किलो तांदूळ, एक किलो आटा, 2 किलो गहू, 1 किलो साखर, तेल, चहापूड, सॅनिटायझर आणि मास्क या वस्तू देण्यात आल्या. साहित्य वाटण्यासाठी त्यांनी घराजवळ एक तंबू उभारला. त्याच्या माध्यमातून कम्युनिटी किचन सुरू करण्यात आलं. ज्यामुळे घरी जेवण तयार करता येत नाही त्यांच्या जेवणाची सोय झाली. दोन्ही भावांच्या या मदतकार्याला पोलिसांनीही हातभार लावला. त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांकडून पास देण्यात आले आहेत. ज्यामुळे बाइकवरून जात लोकांना साहित्य पोहोचवता येईल. लोकांची भूक भागवण्यासाठी स्वत:ची जमीन विकणारी ही भावंडं जास्त शिकलेली नाहीत. लहान भाऊ 5 वर्षांचा आणि मोठा भाऊ 8 वर्षांचा असतानाच आई-वडीलांचे निधन झाले. त्यानंतर आजीसोबत दोघेही कोलार इथं आले. पैशांची अडचण असल्यानं चौथीपर्यंतच शिक्षण घेऊ शकले. हे वाचा : प्रीपेड रिचार्ज, वीज व पुस्तकांच्या दुकानांसह सरकारने कुठे दिली सूट? वाचा यादी आतापर्यंत त्यांनी 2800 कुटुंबातील 12 हजार लोकांना मदत केली आहे. तजामुलने सांगितलं की,  लहान असताना एका माणसाने त्यांना मशिदीजवळ घर दिलं. हिंदू, मुस्लिम, शिख आणि इतर लोकांनी आम्हाला खायला दिलं. तेव्हा जात आमच्या आडवी आली नाही. माणुसकी सोबत होती आणि आता त्याच माणुसकीसाठी काम करत आहे. त्यावेळी आम्हाला भाकरीची मत कळाली होती असंही तजामुलने म्हटलं. हे वाचा : चिंताजनक! पुण्यात आज 104 रुग्ण वाढले; एका दिवसातली आजवरची सर्वात मोठी वाढ
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या