नवी दिल्ली, 24 एप्रिल : लहान वयातली मुलं जी कँडी क्रश खेळतात त्याच वयात 15 वर्षीय भारतीय मुलगी अमेरिकेतील लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम करत आहे. हीता गुप्ता असं तिचं नाव. अमेरिकेतील पेन्सिलवेनियातील कोनेस्टोगा हायस्कूलमध्ये ती दहावीमध्ये शिकते. सध्या लॉकडाऊनमुळे ती घरातच अडकली आहे. मात्र याही काळात ती लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचं काम करत आहे. या काळात नर्सिंग होममध्ये असलेल्या वृद्धांसहल लहान मुलं एकाकी पडले आहेत. यांना गिफ्ट आणि प्रेरणादायी पत्रं लिहून त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करत आहे. अवघ्या 15 वर्षांची हीता एक ब्राइटनिंग अ डे नावाची एनजीओ चालवते. ती अमेरिकेतील नर्सिंग होममध्ये राहणाऱ्या वृद्धांमध्ये प्रेम आणि आशेचा किरण निर्माण करण्याचा प्रयत्न करते. हीता गुप्ता तिच्या हाताने लिहिलेली पत्र पाठवते. त्यासोबत गिफ्टही देते. यात कथांची पुस्तकं, रंगाच्या पेन्सिल यांचा समावेश असतो. पीटीआयशी बोलताना तिने सांगितलं की, मला हा विचार करून दु:ख होतं की अनेक नर्सिंग होममध्ये राहणाऱ्या लोकांना किती एकटं आणि तणावपूर्म वाटत असेल. आपल्या जवळच्या लोकांना भेटता येत नाही. वृद्ध लोक आधीपासूनच एकटे आहेत. एका अभ्यासात अशी गोष्ट समोर आली की 40 टक्के वृद्धांना एकटेपणा जाणवतो. कोरोनाच्या संकटकाळात एकट्या पडलेल्या जेष्ठ नागरिकांमध्ये भीतीचं वातावऱण तयार झालं आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की ते एकटे नाहीत हे सांगण्याची. मी यासाठी स्वत:च्या पैशातून गिफ्ट पाठवायला सुरुवात केली. आतापर्यंत 16 स्थानिक नर्सिंग होममध्ये राहणाऱ्यांसाठी गिफ्ट पाठवली असल्याचंही हीताने सांगितलं. हे वाचा : पुण्याची डॉक्टर महिला मृत्युमुखी; ही बातमी आहे FAKE - शेअर करण्यापूर्वी हे वाचा हीताच्या या कामाचं कौतुक जगभरातून होत आहे. नवी दिल्लीत अमेरिकन दूतावासाने त्यांच्या फेसबूक पेजवर म्हटलं की, काही प्रेरणा हवी आहे का? अमेरिकेत पेन्सिलवेनियातील 15 वर्षीय हीता गुप्ता गिफ्ट आणि पत्रातून नर्सिंग होममध्ये राहणाऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करत आहे. हे वाचा : वाढदिवशी मिळालं आयुष्याचं गिफ्ट, कोरोनातून बरी झाल्यानंतर डॉक्टर रुग्ण सेवेत गिफ्टसोबत हीता तिच्या भावाने लिहिलेलं एक पत्रही पाठवते. अमेरिकेतील सात राज्यांमध्ये असलेल्या 50 रुग्णालयात आणि नर्सिंग होममधील 2700 मुलांपर्यंत हीताची एजन्सी पोहोचली आहे. हीताने फक्त अमेरिकेतच नाही तर भारतातील अनाथालयांमध्ये शालोपयोगी साहित्या आणि कार्ड पाठवली आहेत. हे वाचा : ‘आम्हाला भाकरीची किंमत माहिती आहे’, गरीबांच्या पोटासाठी भावांनी विकली जमीन
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.