कोलंबो 29 जानेवारी: श्रीलंकेला भारताकडून कोरोना वॅक्सीन (Corona Vaccine) मिळाल्यानंतर शुक्रवारी कोलंबोच्या (Colombo) आसपास असणाऱ्या 6 रुग्णालयांमध्ये लसीकरणाला प्रारंभ झाला. याअंतर्गत सर्वात आधी आरोग्य कर्मचारी, सेनेतील जवान आणि सुरक्षा रक्षकांना ही लस देण्यात आली. भारतानं श्रीलंकेला कोरोना लसीकरणाचे 5 लाख डोस मोफत दिले आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) ही लस पोहोचल्यानंतर स्वतः विमानतळावर गेले होते. त्यांनी कोविशील्ड वॅक्सिनसाठी भारताचे आभारही मानले. भारताने मागच्याच आठवड्यात घोषणा केली होती, की भारताकडून भूतान, मालदीव, बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार आणि सेशेल्स, अफगानिस्तान आणि मॉरीशस यांना मदत म्हणून कोरोना लसीकरणाचे डोस दिले जातील. भारताकडून आतापर्यंत शेजारी असलेल्या नेपाळ, बांग्लादेश, भूतान आणि मालदीवला हे डोस पोहोचण्यात आले आहेत.
(वाचा - अरे बापरे! फुफ्फुसातून गायब झाला तरी मेंदूत लपून बसतोय कोरोनाव्हायरस )
राजपक्षे यांनी मानले भारताचे आभार - एअर इंडियाच्या विशेष विमानाच्या माध्यमातून जेव्हा निशुल्क डोस तिथे पोहोचले तेव्हा कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती राजपक्षेही उपस्थित होते. यानंतर राजपक्षे यांनी ट्विट केलं, की भारताकडून पाठवण्यात आलेले कोरोना वॅक्सिनचे 5 लाख डोस मिळाले. गरजेच्या वेळी श्रीलंकेच्या लोकांसाठी दाखवलेल्या उदारतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या नागरिकांचे आभार.
(वाचा - देशात नव्या कोरोना रुग्णांचा आकडा घटला; पण महाराष्ट्राला दिलासा नाहीच )
भारतीय उच्च आयोगाचं ट्विट - भारतीय उच्च आयोगानं ट्विट केलं, की कोविशिल्ड लसीचे 5 लाख डोस पोहोचले. ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेकाद्वारे विकसित आणि सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाद्वारा तयार केलेल्या या लसीच्या आपातकालीन परिस्थितीतील वापराला परवानगी दिल्यानंतर लस पाठवली गेली आहे.