नवी दिल्ली, 04 एप्रिल : जगात कोरोनाने हाहाकार माजवला असून जवळपास 205 देशांमध्ये व्हायरस पसरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याची चिन्हे दिसत नसून यामुळे आतापर्यंत जगात 60 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 11 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतातही कोरोना पसरत चालला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येनं भारतात 3 हजारांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत भारतात 75 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फटका सर्वाधिक इटली आणि स्पेन या देशांना बसला आहे. इटलीत मृत्यूचे प्रमाण 12.3 टक्के इतकं तर फ्रान्समध्ये 10 टक्के इतकं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत मृत्यूचं प्रमाण 2.8 टक्के इतकं आहे. जगातील मोठे पाच देश कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत जवळपास 14 हजार लोकांचा तर स्पेनमध्ये 12 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. बायको-मुलांना कोरोना होऊ नये म्हणून पोलीस अधिकाऱ्याचे गॅरेज हेच घर इटली आणि स्पेन यांच्यानंतर फ्रान्समध्ये सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये 6 हजारांहून अधिक लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. ब्रिटनमध्येही कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. आतापर्यंत तिथं कोरोनामुळे 3 हजार 600 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात कोरोना जिथून पसरायला सुरुवात झाली त्या चीनमध्ये 3326 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरस आटोक्यात आला आहे. सर्वात बलाढ्य अशा अमेरिकेला कोरोनाने नामोहरम केलं आङे. आतापर्यंत अमेरिकेत 7 हजार लोकांचा मृत्यू झाला असून दररोज हजारो लोकांना याची लागण झाल्याचं समोर येत आहे. शुक्रवारी एका दिवसात अमेरिकेत 1500 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय जगात जर्मनी, इराण, नेरलँड, बेल्जियम या देशांमध्ये एक हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. दिवसा सुरक्षेचं काम, घरी परतल्यावर मास्कचं शिवणकाम, CM कडून कौतुकाची थाप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.