भोपाळ, 4 एप्रिल : देशभरातील कोरोनाचा (Coronvirus) कहर वाढत आहे, यासाठी देशातील सुरक्षा व्यवस्था, पोलीस अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी जीवाची बाजी लावून नागरिकांचं रक्षण करीत आहेत. यातच एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व समोर आलं आहे. ही महिला पोलीस कर्मचारी दिवसा जनतेचं रक्षण करण्यासाठी ड्यूटीवर असते आणि सायंकाळी घरी आल्यावर गरजुंसाठी मास्क शिवते. या पोलीस महिला कर्मचारीचं देशभरातून कौतुक होत आहे. मध्य प्रदेशचे (Madhya pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रेरणादायी महिलेबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. हिचं नाव सृष्टी श्रोतिया आहे. सृष्टी मध्यप्रदेशातील सागर येथील खुरई ठाण्यात ड्युटीवर असते. लॉकडाऊनच्या काळात पोलिसाचं काम केल्यानंतर ती घरी जाऊन मास्क शिवते. हे मास्क ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्यांना वाटते. सृष्टीच्या या कर्तृत्वाला कोटी कोटी नमन्, असं शिवराज सिंह यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे. संबंधित - मोदी सरकारचा मोठा निर्णय, 50 कोटी जनतेची Covid -19 चाचणी होणार मोफत ‘मुली या सृष्टीचा आधार असतात आणि यांच्यामुळेच सृष्टी धन्य होते’, असंही चौहान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यापूर्वीही सिंह यांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका ड़ॉक्टरांबाबत ट्विट केलं होतं.
आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशॄङखला ।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 4, 2020
यया बद्धा: प्राधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत्॥
सृष्टि का आधार हैं बेटियां और इन्हीं से सृष्टि धन्य होती है। श्रृष्टि जैसी बेटियों से बारंबार धन्य हुई यह धरा! बेटी, सदा खुश रहो और जगत का कल्याण करती रहो! #COVID19 #COVIDWarriors https://t.co/TjklVefrMf
ते डॉक्टर पाच दिवसांनी घरी आले पण ते घराच्या गेटपाशी बसून राहिले. तेथेच त्यांनी चहा घेतला आपल्या बायको – मुलांना डोळे भरुन पाहिलं आणि निघून गेले. तेव्हादेखील त्या ड़ॉक्टरांचं मोठं कौतुक झालं होतं.या निमित्ताने चौहान कोरोना योद्धांचं कर्तृत्व जगासमोर आणत आहे.