नवी दिल्ली, 01 मे: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं (Corona virus 2nd wave) देशात हाहाकार उडवला आहे. भारतात कोरोना रुग्णांची वाढती संख्या (Corona patients in India) ही जगभरातील विविध देशांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. त्यामुळे बऱ्याच देशांनी भारतीय प्रवाशांवर कठोर निर्बंध लादली आहेत. ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन आणि सौदी अरेबियानंतर आता नेपाळनंही भारतीय प्रवाशांवर (Nepal restrictions on indian transport) बंदी घातली आहे. नेपाळनं भारतातून नेपाळमध्ये प्रवेश करता येणारी 22 प्रवेशद्वारं (Close 22 entry points) बंद केली आहेत. भारतात कोरोना विषाणूचा वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताचा शेजारी असणाऱ्या नेपाळनं कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेच्या वेळीही अशा प्रकारची कारवाई केली होती. पण कोरोना विषाणूची पहिली लाट ओसरताचं त्यांनी पुन्हा निर्बंध हटवले होतं. पण सध्या कोरोना विषाणूची दुसरी लाट भारतात उग्न रुप घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी भारतीय विमान वाहतूकीवर विविध निर्बंध लादले आहेत. विशेष म्हणजे सध्या नेपाळमध्येही कोरोना विषाणूचा धोका गडद होतं चालला आहे.
लाइव्ह हिंदुस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, नेपाळमध्ये काल एकाच दिवशी विक्रमी 35 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा एकाच दिवसांत होणाऱ्या मृतांच्या आकडेवारीत सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक मृतांची नोंद झाली होती, यादिवशी देशात 30 रुग्णांनी आपले प्राण गमावले होते. नेपाळमध्ये आतपर्यंत एकूण 3 हजार 246 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारतात दरदिवशी तीन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू होतं आहे. पण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मागील काही काळापासून नेपाळमध्ये मृत्यूदर वाढला आहे.
हे ही वाचा-भारतातून ऑस्ट्रेलियात जाणार असाल तर खावी लागेल तुरुंगाची हवा, 'हे' आहे कारण
कोरोना विषाणूची दुसरी लाट संपूर्ण जगासाठी एक धोक्याची घंटा ठरत आहेत. भारतापाठोपाठ ब्राझीलमध्येही कोरोना विषाणूचा विळखा घट्ट झाला आहे. दुसरीकडे अमेरिका मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावातून स्वतःला सावरताना दिसत आहे. याठिकाणी कोरोना लसीकरणावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. तसेच अनेक देश भारताच्या मदतीला सरसावले असून वैद्यकिय मदतीचा ओघ वाढताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Nepal, Restricted