लॉकडाऊन हटवताच चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा भडका, एका दिवसात 63 कोरोना पॉझिटिव्ह

लॉकडाऊन हटवताच चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा भडका, एका दिवसात 63 कोरोना पॉझिटिव्ह

तीन दिवसात चीनमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. अचानक एका दिवसात 63 रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे

  • Share this:

वुहान, 9 एप्रिल :  चीनमधील गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून सुरू असलेले लॉकडाऊन (Lockdown) हटविण्यात आले आहे. त्यामुळे चीनमधील (China) चिंता कमी झाल्याचे वाटत असतानाच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. चीनमधील कोरोना व्हायरसचे (Coronavirus) नवीन 63 रुग्ण समोर आले आहेत. यामधील दोघे चीनमधील रहिवासी तर उरलेले परदेशातून आलेले आहेत. अचानक 63 रुग्ण सापडल्यानंतर चीनमध्ये पुन्हा कोरोनाची संकट घोंगावत आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दोन महिन्यांपेक्षा अधिक कालवधीनंतर लॉकडाऊन हटविण्यात आले. त्यातच देशात नवीन रुग्ण सापडल्याने देशाची चिंता वाढली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने गुरुवारी (9 एप्रिल) सांगितले की, बुधवारी 36 नवीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. यापैकी 61 जण परदेशातील आहेत. काही काळापासून चीनमध्ये कोरोनाची नवी प्रकरणं येत नव्हती. सलग तीन दिवस कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण समोर आला नव्हता. मात्र पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. 63 रुग्णांसह आता चीनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1104 इतकी झाली आहे.

संबंधित - महिला पोलिसाचं ममत्व आलं धावून, महिलेची जिप्सीमध्ये केली प्रसूती

लॉकडाऊन हटवताच वुहानमध्ये मांस खरेदीला वेग, अमेरिकेकडून बाजार बंद करण्याची मागणी

कोरोना रिसर्चमध्ये चीन अव्वल

कोरोना व्हायरस रोखण्यासाठी जगभरात जितके रिसर्च आणि क्लिनिकल शोध सुरू आहेत, त्यामध्ये सर्वाधिक 60 शोध आणि प्रयोग करीत चीन सर्वात पुढे आहे. ब्रिटेनच्या एका कंपनीने आपल्या सर्वेक्षणात दिल्यानुसार यावेळी जगात 39 देशांपैकी कोरोनाची लसीचा शोध घेण्यात आणि यासंदर्भात सुरू असलेल्या संशोधनाची संख्या तब्बल 300 इतकी आहे. त्यात चीनमधील शोधसंख्या 60 इतकी आहे. तर अमेरिकेने 49 शोध व अभ्यास केल्याचे समोर आले आहे.

First published: April 9, 2020, 6:06 PM IST

ताज्या बातम्या