वुहान, 9 एप्रिल : दोन महिन्यांनंतर चीनच्या वुहान (Wuhan) शहरातून लॉकडाऊन उठविण्यात आलं आहे. या शहरातून कोरोना (Covid - 19) विषाणूची सुरूवात झाली होती. लॉकडाऊन उठताच लोकांची गर्दी रस्त्यावर दिसली. एवढेच नाही तर येथे मांस विक्रीचा बाजार सुरू झाला आहे. इथली सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या बैशाजूच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरिक नॉन-व्हेज विकत घेण्यासाठी येथे येत आहेत. चीनच्या (China) याच मांस आणि मासे विक्रीच्या बाजारात कोरोनाची पहिली घटना समोर आली होती, असे काहींचे म्हणणे आहे
'बाजार बंद करणे शक्य नाही'
अशा बाजारात मांस आणि मासे लोकांसमोर जिवंत कापले जातात. जगातील इतर शहरांत बाहेरुन मांस कापून बाजारात आणले जाते. चीनच्या वॉटचलु विद्यापीठाचे संशोधक डॉक्टर म्हणतात की, अशा बाजारपेठा बंद करणे शक्य होणार नाही. वस्तुतः अशी बाजारपेठा बंद करणे चीनमधील नागरिकांसाठी त्रासदायक ठरेल. कारण या बाजारांमधून नागरिकांना स्वस्त आणि निरोगी अन्न विकत घेता येतं.
Wet markets are returning to life in #Wuhan and other parts of China, where the #coronavirus first emerged.
More @business: https://t.co/kBmgIKA6Se #COVIDー19 #CoronavirusPandemic pic.twitter.com/lmjmQTSq4m
— QuickTake by Bloomberg (@QuickTake) April 9, 2020
बंद करण्याची मागणी केली
चीनची ही बाजारपेठ सुरू झाल्यानंतर अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा खुली करण्याची परवानगी का देण्यात आली याविषयी जगात चर्चा सुरू झाली आहे. गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांनी बाजार त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. कोरोना विषाणू केवळ अशाच ठिकाणांमधून वाढू शकतो, असा युक्तीवाद त्यांनी केला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी इन्फेक्टीव्ह डिसिसजचे संचालक डॉ.एंथनी फौसी यांनी ही बाजारपेठा खुली केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
ते म्हणाले की, अशा प्रकारच्या घाणेरड्या बाजारापासून विषाणू पसरतात. दक्षिण कैरोलिना येथील सिनेटचा सदस्य लिंडसे ग्रॅहम यांच्यासह रिपब्लिकन खासदारांनी चीनी अधिकाऱ्यांना असे मार्केट पुन्हा न उघडण्याचं आवाहन केलं आहे. ग्रॅहम यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राजदूताला एक पत्र पाठवून सरकारवर दबाव आणण्यास सांगितले.
लोक सर्व प्रकारचे मांस खातात
चीनमधील वुहानमध्ये वन्य प्राण्यांच्या मांसासाठी एक मोठी बाजारपेठ आहे. चीनमध्ये अनेक प्राण्यांचे मांस खाल्ले जाते. साप-विंचूपासून घोडा-गाढव आणि उंट पर्यंतचे मांस वुहानमध्ये आढळते. असे म्हटले जाते की, वुहानच्या मांस बाजारातून कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. कोरोना विषाणूने वटवाघूळ , साप आणि सरडे यांसारख्या प्राण्यांच्या माध्यमातून मानवी शरीरात प्रवेश केला, असेही म्हटले जाते. त्यांचे मांस चीनच्या वुहान शहरात आढळते. चीनमधील लोक मोठ्या उत्साहाने या प्राण्यांचे मांस खात आहेत.
संबंधित -मोदींनी पुन्हा जिंकलं, ट्रम्प यांच्या आभारानंतर पंतप्रधानांनी दिलं असं उत्तर
कोरोना रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह समजून दिला डिस्चार्ज, पोलिसांचा शोध सुरू
संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे