मराठी बातम्या /बातम्या /देश /

महिला पोलिसाच्या ममत्वाने वाचवला बाळाचा जीव, प्रसववेदनांनी कळवळणाऱ्या महिलेची जिप्सीमध्येच केली प्रसूती

महिला पोलिसाच्या ममत्वाने वाचवला बाळाचा जीव, प्रसववेदनांनी कळवळणाऱ्या महिलेची जिप्सीमध्येच केली प्रसूती

महिलेला अचानक प्रसवकळा सुरू झाल्या होत्या. ती कळवळत होती. त्यात रुग्णवाहिकेलाही येण्यास उशीर होत होता

महिलेला अचानक प्रसवकळा सुरू झाल्या होत्या. ती कळवळत होती. त्यात रुग्णवाहिकेलाही येण्यास उशीर होत होता

महिलेला अचानक प्रसवकळा सुरू झाल्या होत्या. ती कळवळत होती. त्यात रुग्णवाहिकेलाही येण्यास उशीर होत होता

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 9 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाला (Covid - 19) रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन (Lockdown) केलं आहे. या काळात पोलीस अधिकारी आपलं काम निष्ठेने करीत आहेत. आपण कुटुंबीयांसोबत घरात असताना ते मात्र बाहेर देशसेवा करीत आहेत.

लॉकडाऊन दरम्यान पोलिसांच्या वेगवेगळ्या प्रतिमा देशभरातून समोर येत आहेत. त्यातच मंगळवारी झालेल्या एका घटनेतून पुन्हा एकदा पोलिसांचा हळवा कोपरा समोर आला आहे. आलेल्या बिकट परिस्थितीवर मात करीत देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवणं हे त्यांचं प्रथम कर्तव्य असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. मंगळवारी रात्री दिल्लीच्या कोटला मुबारकपूर भागातील लेबर कॅम्पमध्ये महिलेची प्रसूती झाली. कुटुंबातील सदस्यांनी रुग्णवाहिका बोलवण्याचा प्रयत्न केला मात्र ते होऊ शकले नाही. त्यात महिलेला प्रसवकळा सुरू झाल्या होत्या. ती कळवळत होती. यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या काही पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला. आज तकने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.

संबंधित -'तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकता;आम्ही नाही', मुंबई पोलिसांचा 'हा' VIDEO पाहाच

या पोलिसांनी आधी जवळील काही महिलांना बोलावलं. एक महिला पोलिसांनी ही जबाबदारी घेत इतर गोष्टींची जमावाजमव सुरू केली. बाहेर प्रसूती करणं शक्य नव्हतं. त्यामुळे बाळ व आईला संसर्ग होण्याची शक्यता असते. यासाठी पोलिसांनी जिप्सीमध्येच प्रसूती करायचं ठरवलं. काहीजणी जिप्सीमध्ये तर उरलेल्या महिला जिप्सीभोवती उभ्या होत्या. काही वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर बाहेर पोलिसांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. प्रसूती झाल्यानंतर महिला पोलिसाने बाळाला कुशीत घेतलं. यावेळी तिच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. बाळाला कोणताही संसर्ग होऊ नये याची काळजी घेतली जात होती. यानंतर आई व बाळाला पुढील तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आलं.

संबंधित - डॉक्टरनं शोधली भन्नाट !dea , एकाच व्हेंटिलेटरवरून 8 रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा

संपादन, संकलन - मीनल गांगुर्डे

First published: