जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Virat Kohli 100th Test : विराटच्या जुन्या मित्रांनी सांगितले WhatsApp Group मधील खास किस्से

Virat Kohli 100th Test : विराटच्या जुन्या मित्रांनी सांगितले WhatsApp Group मधील खास किस्से

Virat Kohli 100th Test : विराटच्या जुन्या मित्रांनी सांगितले WhatsApp Group मधील खास किस्से

विराट कोहली (Virat Kohli) शुक्रवारी श्रीलंका विरूद्ध (India vs Sri Lanka) 100 वी टेस्ट खेळण्यासाठी उतरणार आहे. या ऐतिहासिक मॅचपूर्वी त्याच्या जुन्या मित्रांनी विराटच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 मार्च : विराट कोहली (Virat Kohli) शुक्रवारी श्रीलंका विरूद्ध (India vs Sri Lanka) 100 वी टेस्ट खेळण्यासाठी उतरणार आहे. या ऐतिहासिक मॅचपूर्वी त्याच्या जुन्या मित्रांनी विराटच्या आठवणी शेअर केल्या आहेत. 2008 सााली अंडर 19 टीमनं वर्ल्ड कप जिंकला आणि विराट कोहली हे नाव देशाला माहिती झाले. विराट त्या टीमचा कॅप्टन होता. या घटनेला आता 14 वर्ष उलटली आहेत. या कालावधीमध्ये विराटचा खेळाडू म्हणून झपाट्यानं उदय झाला. तो टीम इंडियाचा कॅप्टन बनला. आज जगातील प्रमुख क्रिकेटपटू अशी त्याची ओळख आहे. विराटनं क्रिकेटपटू म्हणून मोठा प्रवास केला आहे. त्यानंतरही तो त्याच्या अंडर 19 टीममधील मित्रांना विसरलेला नाही. या टीमच्या सदस्यांनी 2020 साली लॉकडाऊनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे.  या ग्रुपमध्ये त्या टीममधील सर्व खेळाडू आहेत. विराटच्या टीममधील सहकाऱ्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ शी बोलताना या ग्रुपमधील मजेदार किस्से सांगितले आहेत. ‘या ग्रुपमध्ये अंडर 19 वर्ल्ड कप काळातील आठवणींना उजाळा दिला जातो. त्याचबरोबर मीम्स, जोक्स यांच्या माध्यमातून एकमेकांची थट्टा मस्करी केली जाते. कोणत्याही सदस्याच्या बाबतीत यामधून सुट मिळत नाही,’ सर्वांवर मीम्स आणि जोक्स होता असे या टीममधील स्पिनर इक्बाल अब्दुल्लाने सांगितले. विराटनं केली होती चूक अब्दुल्लानं यावेळी विराटनं अंडर 19 वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये केलेली चूक देखील सांगितली. एका वर्ल्ड कप मॅचपूर्वी त्याने माझी फिल्डिंगची जागा बदलली होती. मी मिडविकेटवर फिल्डिंग करत होतो. बॅटरनं स्केवयर लेगला शॉट लगावला. त्यावेळी विराटनं मला तिकडं फिल्डिंगला पाठवलं. त्यानंततर बॅटरनं  मिडविकेटला शॉट लगावला आणि विराट माझ्यावर रागवला. त्यानंतर मला संपूर्ण घटनाक्रम सांगावा लागला. ही चूक सांगून आम्ही आजही विराटची थट्टा करतो, असे अब्दुल्ला म्हणाला. Chelsea for Sale: पुतीनच्या यांच्या जवळच्या अब्जाधीशाची चेल्सी क्लब विक्रीची घोषणा, युक्रेन युद्धपीडितांना करणार मदत विराट कोहलीमध्ये  एटीट्यूड आहे असे अनेकांना वाटतं. पण, तो खेळायला लागतो त्यावेळी तोच एटीट्यूड त्याची आक्रमकता बनतो. ती आक्रमकता विराटच्या डोळ्यात दिसते, असा दावा वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वात जास्त रन करणारा बॅटर तन्मय श्रीवास्तव याने केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात