Home /News /sport /

Chelsea for Sale: पुतीनच्या यांच्या जवळच्या अब्जाधीशाची चेल्सी क्लब विक्रीची घोषणा, युक्रेन युद्धपीडितांना देणार मदत

Chelsea for Sale: पुतीनच्या यांच्या जवळच्या अब्जाधीशाची चेल्सी क्लब विक्रीची घोषणा, युक्रेन युद्धपीडितांना देणार मदत

रशिया-युक्रेन युद्धाची तीव्रता (Russia-Ukraine War) कायम आहे. त्याचवेळी फुटबॉल विश्वातून मोठी बातमी येत आहे. रशियन अब्जाधीश रोमन अब्रामोविच ( Roman Abramovich) चेल्सी (Chelsea FC) हा बडा फुटबॉल क्लब विकण्याच्या तयारीत आहेत.

    मुंबई, 3 मार्च : रशिया-युक्रेन युद्धाची तीव्रता (Russia-Ukraine War) कायम आहे. त्याचवेळी फुटबॉल विश्वातून मोठी बातमी येत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीनच्या (Vladimir Putin) जवळचे रशियन अब्जाधीश रोमन अब्रामोविच ( Roman Abramovich) चेल्सी (Chelsea FC) हा बडा फुटबॉल क्लब विकण्याच्या तयारीत आहेत. रोमन यांनी बुधवारी याबाबतची घोषणा केली आहे. युक्रेनमधील युद्धातील जखमी आणि पीडितांना मदत करण्यासाठी आपण एक स्वयंसेवी संस्था स्थापन करणार असल्याचं रोमन यांनी जाहीर केलं आहे. रोमन अब्रानोविच यांनी 2003 साली या क्लबची खरेदी केली होती. त्यानंतर अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे विजेतेपद या टीमनं पटकावले आहे. ही टीम 2020-21 सालातील युएफा चॅम्पिन्स लीग स्पर्धेची विजेता आहे. युरोपातील दिग्गज टीममध्ये चेल्सीचा समावेश होतो. फोर्ब्सनं 2021 साली व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या फुटबॉल क्लबची किंमत 3.2 बिलियन डॉलर म्हणजेच 22 हजार कोटी आहे. चेल्सीच्या मालकांनी क्लबची विक्री करण्याचा निर्णय फॅन्स, क्लबचे कर्मचारी, स्पॉन्सर आणि पार्टनर्स यांच्या फायद्याचा आहे, असा दावा केला आहे. या क्लबची विक्री घाईघाईनं होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एका प्रोसेसच्या माध्यमातून ही संपूर्ण विक्री प्रक्रिया करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण चेल्सी कल्बची खरेदी ही व्यवसाय किंवा बिझनेस म्हणून नाही तर, खेळाबद्दल असलेल्या आवडीमुळे केली होती, असा दावा त्यांनी केला आहे. BCCI Central Contracts : 2 मुंबईकरांचं प्रमोशन, चांगल्या कामगिरीचं मिळालं बक्षीस रोमन यांनी आपल्या टीमला स्वयंसेवी संस्था स्थापन करण्याचे आदेश दिला आहे. या संस्थेच्या मार्फत ते युक्रेन युद्धाचा फटका बसलेल्या पीडित नागरिकांना मदत करणार आहेत. रोमन यांच्या कार्यकाळात चेल्सीनं 2 वेळा चॅम्पियन्स लीग आणि 5 वेळा इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धा जिंकली आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लिश प्रीमियर लीगमध्येही ही टीम 50 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडच्या सरकारनं क्लबवर बंदी घालून संपत्ती जप्त करू नये म्हणून रोमन यांनी हा निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Football, Russia, Russia Ukraine, Vladimir putin

    पुढील बातम्या