वॉशिंग्टन, 03 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून चॅटजीपीटीची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. तुम्ही कोणताही प्रश्न विचारलात तर त्यासाठी चॅट जीपीटी त्याचं उत्तर देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेटवर असलेल्या डेटाचा उपयोग करतं. आता याच चॅट जीपीटीचा वापर करून एका न्यायाधीशांनी निकालपत्र तयार केलं आणि निर्णयही दिल्याचा प्रकार घडला आहे. कोलंबियातील एका न्यायाधीशांच्या याबाबत माहितीही दिली की, मुलांच्या उपचाराच्या अधिकाराशी संबंधित न्यायालयाचा एक निर्णय तयार करण्यासाठी चॅटबॉट चॅट जीपीटीचा वापर केला होता.
अमेरिकन चॅनेल सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार न्यायाधीश जुआन मॅन्युअल पाडिला यांन म्हटलं की, एका मुलाच्या उपचारासाठी आई-वडील आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते. त्याच्या वैद्यकीय खर्चात आणि वाहतूक शुल्कात सूट देण्याच्या प्रकरणात मी चॅट जीपीटीचा वापर केला होता. चॅट जीपीटी आणि त्यासारखे इतर प्रोग्रॅम ड्राफ्ट तयार करण्यासाठी सहायक ठरू शकतील पण न्यायाधीशांसाठी पर्याय बनू शकणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : हुश्श! अखेर 6 दिवसांच्या शोधानंतर 'कॅप्सूल' सापडली, ऑस्ट्रेलियासह जगाचा जीव पडला भांड्यात
न्यायाधीश जुआन मॅन्यूअल यांनी मुलाच्या बाजूने निकाल दिला. न्यायाधीशांनी निकालात म्हटलं की, या प्रकरणात सुनावणीवेळी चॅट जीपीटीची मदत घेतली होती. पण असं नाही की प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आम्ही या एपचा वापर केला तर न्यायाधीश म्हणून काम करण्याच्या आमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करता येईल. तर असं करून आम्ही एखाद्या मुद्द्यावर आमच्या विचाराला आणखी मदत देऊ शकतो.
न्यायालयात सुनावणीवेळी चॅटबॉटला जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यात एक असाही होता की, याआधी कधी ऑटिस्टिक अल्पवयीन मुलाला त्याच्या उपचारांच्या फीमध्ये सूट मिळाली आहे का? यावर चॅट बॉटने हो दिली होती. कोलम्बियात नियमानुसार याआधीही ऑटिझमग्रस्त अल्पवयीन मुलांना त्यांच्या उपचाराच्या खर्चात सूट दिली होती. न्यायाधीशांनी म्हटलं की, चॅटजीपीटी एका सेक्रेटरीचं काम करतं. चॅटबॉट न्यायव्यवस्थेत रिस्पॉन्स सिस्टिमला दुरुस्त करू शकते.
हेही वाचा : मैत्रीण गर्लफ्रेंड नाही झाली, मित्राची थेट कोर्टात धाव, ठोकला कोट्यावधींचा दावा
रोजारियो विद्यापीठातील प्राध्यापक जुआन डेव्हिट गुटरेस यांनी न्यायाधीश जुआन मॅन्युअल पाडिला यांच्या विचारांशी आपण समहत नसल्याचं म्हटलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेग्युलेशन आणि गव्हर्नन्सचे तज्ज्ञ असलेल्या गुटेरस यांनी म्हटल की, चॅट जीपीटीला मी तेच प्रश्न विचारले तर वेगवेगळी उत्तरे मिळाली. ट्विटरवर त्यांनी म्हटले आहे की, न्यायव्यवस्थेत चॅटजीपीटीचा वापर करणं जोखमीचं आहे किंवा ते नैतिकदृष्ट्या योग्य नाही. न्यायाधीशांसाठी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण सुरू करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, चॅटजीपीटीवरून बऱ्याचदा सदोष माहितीही समोर येत असल्यानं याचा संदर्भ म्हणून वापर चुकीचा असल्याचं काहींचे म्हणणे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: USA