मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

इथे धुवांधार पाऊस, तर तिथे UAE मध्ये कधीच नाही एवढी आग ओगतोय सूर्य; 51 अंशांवर पोहोचलं तापमान, प्रशासनाने केला नवा नियम

इथे धुवांधार पाऊस, तर तिथे UAE मध्ये कधीच नाही एवढी आग ओगतोय सूर्य; 51 अंशांवर पोहोचलं तापमान, प्रशासनाने केला नवा नियम

मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी इथलं तापमान 51 डिग्री सेल्सियस नोदवलं गेलं होतं.

मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी इथलं तापमान 51 डिग्री सेल्सियस नोदवलं गेलं होतं.

वाढलेल्या तापमानामुळे प्रशासनाने नवीन नियम (New rules in UAE ) केला आहे. पालकांनी मुलांना गाडीमध्ये ठेवून बाहेर गेल्यास त्यांना 2 कोटी रुपयांपर्यंतचा दंडही बसू शकतो.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 9 जून : भारतामध्ये मान्सूनने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे वातावरण थोडसं आल्हाददायक बनायला सुरुवात झाली आहे. मात्र, संयुक्त अरब अमिराती (UAE) सारख्या वाळवंटाच्या देशांमध्ये आकाशामधून आग बरसते आहे. दररोज इथलं तापमान वाढतंय (Temperature Rising). आता तर, तापमान 50 डिग्रीच्या पुढे पोहोचलं आहे. त्यामुळे अडचणी देखील वाढल्या आहेत. आत्तापर्यंत 51.8 डिग्री सेल्सियस तापमानाची(51.8C Temperature) नोंद झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी इथलं तापमान 51 डिग्री सेल्सियस नोदवलं गेलं होतं. तर,मे महिन्यापेक्षा जून महिन्यामध्ये जास्त उष्णता (More Heat in June than May) जाणवणार असल्याचं UAE राष्ट्रीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. सध्याचं तापमान 50 डिग्रीच्यापुढे जात असलं तरी जून महिन्यामध्ये आणखीन ते 2 ते 3 डिग्री आणखी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तापमान वाढलं असलं तरी, अद्याप हवामान विभागाने या तापमानाला वर्षातलं सगळ्यात जास्त तापमान म्हणून घोषित केलेलं नाहीये. या आधी 2002 सालच्या जुलै महिन्यामध्ये तापमान 52.8 डिग्रीपर्यंत पोहोचलं होतं. हवामान तज्ज्ञांच्या मते इथल्या काही भागांमध्ये आभाळ यायला सुरुवात झालेली आहे. डोंगराळ भागांमध्ये क्यूमुलीफॉर्म आभाळाची शक्यता आहे. त्यामुळे येथे पाऊस पडू शकतो.

(जगातली सर्वात मोठी विष्णूची मूर्ती एका मुस्लीम देशात पाहा PHOTOS)

UAE मधला नियम

वाढत्या उष्णतेचा विचार करता अबू धाबीच्या पोलिसांनी एक नवीन नियम बनवलेला आहे. घराबाहेर पडणऱ्या पालकांनी त्यांच्या मुलांना गाडीमध्येच ठेवल्यास त्यांना 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 10 लाख दिरहम म्हणजे 2 कोटी रुपयांपर्यंतचा दंडही बसू शकतो. याशिवाय अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांना गाडी टायर बदलण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

(चमत्कार! बर्फाखाली दबलेला हा प्राणी 24 हजार वर्षांनंतरही सापडला जिवंत)

तापमान वाढीचं नेमकं कारण

UAE मध्ये 90च्या दशकानंतर सातत्याने गर्मी वाढती आहे. खगोल विभागानुसार, इथली उष्णता वाढण्याला हवामानामध्ये होणारे मोठे बदल कारणीभूत आहेत. मात्र दर 11 वर्षांनंतर सूर्याच्या हालचालींमध्ये होणाऱ्या काही बदलांना याचं कारण मानलं जाऊ शकत नाही. 2020 पासून देशांमध्ये उष्णता वाढायला लागली मात्र, कोणत्याही अधिकृत माहिती शिवाय हे निश्चित करणं शक्य नाही.

First published:

Tags: Climate change, UAE