दरम्यानच्या काळात बजेट कमी पडलं म्हणून अनेकदा या महाकाय मूर्तीप्रकल्पाचं काम थांबवावं लागलं. एकदा या परिसरातल्या स्थानिकांनी बांधकामाला आक्षेप घेतला म्हणून काम थांबलं. पण ही मूर्ती तयार झाल्यावर इंडोनेशियातलं सर्वांत लोकप्रिय टूरिस्ट अट्रॅक्शन ठरेल, हे पटल्यानंतर विरोध कमी झाला आणि काम सुरू झालं.