जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Coronavirus चं कम्युनिटी संक्रमण तर नाही ना? आता सांडपाण्याची तपासणी होणार

Coronavirus चं कम्युनिटी संक्रमण तर नाही ना? आता सांडपाण्याची तपासणी होणार

त्यामुळे रशियाच्या या चाचण्यांचे निष्कर्ष काय येतात याकडे सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे.

त्यामुळे रशियाच्या या चाचण्यांचे निष्कर्ष काय येतात याकडे सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे.

नेदरलँडमध्ये सांडपाण्याची (Sewage) तपासणी केल्यानंतर कोरोनाची (coronavirus) प्रकरणं समोर आली होती, त्यानंतर शास्त्रज्ञांनी कम्युनिटी संक्रमणाची माहिती सांडपाण्याच्या माध्यमातून मिळू शकते, यावर जोर दिला. आता अमेरिकेतही सांडपाण्याची तपासणी केली जाणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 28 मार्च : कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहे. अनेक टेस्ट केल्या जात आहेत, व्यक्तीनुसार तपासण्या होत आहेत. मात्र आता एखाद्या क्षेत्रात कोरोनाव्हायरसचं संक्रमण तर झालं नाही ना हे तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी सांडपाण्याची (Sewage) तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णाच्या मलातही व्हायरस असतो. शौचानंतर हा मल मलवाहिन्यांमार्फत सीवेज ट्रिटमेंट प्लांटपर्यंत पोहोचतो आणि त्याचं परीक्षण करून त्या क्षेत्रातील संक्रमणाची माहिती मिळू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. एखाद्या क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणाच्या सांडपाण्यात संक्रमित मलाची मात्राही जास्त असेल आणि अशा पद्धतीने भरपूर प्रमाणात संक्रमित असलेल्या क्षेत्राची माहिती मिळू शकते. नेदरलँडमध्ये सांडपाण्यामुळे समजलं होतं संक्रमण नेदरलँडच्या शास्त्रज्ञांना 5 मार्चला एमर्सफुर्टच्या एका सीवेज ट्रिटमेंट प्लांटमधील सांडपाण्यात कोरोनाव्हायरसचे जेनेटिक मटेरियल मिळाले होते. तोपर्यंत त्या क्षेत्रात कोणतंही कोरोना प्रकरण समोर आलं नव्हतं. देशाती पहिलं प्रकरण 27 फेब्रुवारीला समोर आलं होतं. त्यानंतर अनेक आरोग्य कर्मचारी संक्रमित सापडले. त्यावेळी शास्त्रज्ञांनी कम्युनिटी संक्रमणाची माहिती सांडपाण्याच्या माध्यमातून मिळू शकते, यावर जोर दिला. अमेरिकेतही होणार सांडपाण्याचं परीक्षण अमेरिकेतील शास्त्रज्ञ कोरोनाव्हायरसच्या संक्रमणाची माहिती मिळवण्यासाठी सांडपाण्याची तपासणी करणार आहेत. सीएनएन रिपोर्टनुसार सांडपाण्याची तपासणी करून कोणत्या क्षेत्रात सार्स कोव-2 संक्रमित मल पाण्यात येतो आहे, याचा तपास शास्त्रज्ञ करणार आहेत. अमेरिकेच्या न्यू कासल काऊंटी एक्झिक्युटिव्ह मॅट मेयर यांनी एका टेलिव्हिजन चॅनेलवर अशी माहिती दिली की, “एमआयटी स्टार्टअप बिगोटसह काऊंटीचा करार झाला आहे. काऊंटीची एक आठवड्याची तपासणी झाली आहे आणि लवकरच त्याचे रिझल्टही येतील” मेयरनी सांगितलं, “जेव्हा आम्ही प्रत्येक आठवड्याला अशा प्रकारे तपासणी करू, तेव्हा आम्हाला देशातील संक्रमणाच्या आकडेवारीबाबत माहिती मिळेल, हे आकडे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. आम्ही हॉटस्पॉट्सची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत” हे वाचा -  कोरोनाग्रस्ताच्या विष्ठेमार्फत Coronavirus पसरण्याचा धोका आहे का? सध्या कोरोनाव्हायरसची लक्षणंही दिसत नाहीत. संक्रमित व्यक्तीलाही त्याला कोरोनाव्हायरस झाला आहे याची माहिती नाही. अशावेळी कोरोना संक्रमित व्यक्तीचा शोध म्हणजे एक आव्हानच आहे. अशावेळी सांडपाण्यामार्फत काही ना काही माहिती मिळू शकते. कोणत्या ठिकाणी कोरोना रुग्ण असू शकतो किंवा कोणत्या क्षेत्रात कोरोना संक्रमण जास्त होतं आहे आणि असे किती क्षेत्र आहेत, याची माहिती मिळू शकेल. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा -  घाणेरडे कुठले! टॉयलेटनंतरही धुत नाहीत हात; आता काय म्हणावं या लोकांना

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात