चीनचं स्वप्न झालं उद्ध्वस्त; अंतराळात पाठवलेलं सॅटेलाइट झालं फेल

चीनचं स्वप्न झालं उद्ध्वस्त; अंतराळात पाठवलेलं सॅटेलाइट झालं फेल

अंतराळात राज्य करण्याचे स्वप्न उध्वस्त झाल्याने चीनला मोठा धक्का बसला आहे.

  • Share this:

बीजिंग, 10 जुलै : अंतराळात राज्य करण्याचे स्वप्न उध्वस्त झाल्याने चीनला मोठा धक्का बसला आहे. वृत्तानुसार चीनने अंतराळात पाठवलेला सॅटेलाइन लॉन्च वीइकल शुक्रवारी मध्य रस्त्यात अयशस्वी झाला आणि परत आला. चीनचे सर्वात मोठे घन-इंधनने चालणारे  रॉकेट कुआईझाऊ-11 चीनच्या पश्चिम भागातील जिक्ऊक्वान सॅटेलाइट लॉन्च सेंटरमध्ये फेल झाला. शुक्रवारी, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:17 वाजता, हा चीनी उपग्रह अयशस्वी झाला. यासंदर्भात माहिती देताना चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की उपग्रह बिघडण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. चीनने कमी पैशांत या उपग्रहाचे डिझाईन केले होते.

हे वाचा-ज्यू आणि मुस्लिमांमध्ये कोरोनाचा प्रसार करा; राजकीय पक्षाचं खळबळजनक वक्तव्य

या उपग्रहाबाबत चीनने दावा केला होता की तो एक अत्यंत विश्वासार्ह रॉकेट आहे, परंतु या अपघातामुळे त्यांचा दावा फोल ठरला आहे. हे चिनी रॉकेट सुमारे 70.8 टन पेलोड नेण्यास सक्षम आहे. हा चिनी उपग्रह अंतराळात खालच्या भागांमध्ये उपग्रहांना स्थापित करण्याचे काम करते.

हे वाचा-अमेरिकेसाठी चीन सर्वात मोठा धोका; ट्रम्प बड्या कारवाईच्या तयारीत

यापूर्वी या वर्षी मे महिन्यात आपल्या स्पेस स्टेशनवर कार्गो घेऊन जाण्याच्या विचाराने लॉन्च केलेल्या चीनच्या टेस्ट रॉकेटला तांत्रिक अडचणीनंतर पृथ्वीच्या दिशेने परतला होता. यावेळी मोठं संकट ओढवलं असतं मात्र यातून बचाव करण्यात आला.

Published by: Meenal Gangurde
First published: July 10, 2020, 6:25 PM IST
Tags: china

ताज्या बातम्या