लंडन, 10 जुलै : सध्या जगभराता कोरोनाचा कहर वाढत आहे. जगातील अनेक मोठ मोठ्या देशांना कोरोनाचा मोठा फटका सहन करावा लागला. यामध्ये लाखो नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमधील निओ नाझी नावाच्या संस्थेने आपल्या समर्थकांना देशातील मुस्लिम व यहुदी म्हणजेच ज्यू लोकांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार करण्यास सांगितले आहे. सीएनएनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, फार-राईट एक्स्ट्रिमिस्ट्स नावाच्या निओ नाझी संघटनेने यासह जातीय अल्पसंख्याकांच्या मृत्यूचा देखील उत्सव साजरा केला आहे. कमिशन फॉर काऊंटरिंग एक्स्ट्रीमिस्टच्या तपासणीत असे दिसून आले आहे की, अनेक प्रकारच्या अतिरेकी संघटना आहे जी समाजात द्वेष पसरवित आहे. रिपोर्टमध्ये दिल्यानुसार नियो नाजी संघटना मुस्लिमांबाबत खोटं पसरवतील आहे की ते कोरोना व्हायरसच्या महासाथीमुळे आनंदात आहे. ही ईश्वराची इच्छा असून जी पश्चिमी देशांना शिक्षा देण्यासाठी पाठविण्यात आली आहे. हे वाचा- विकास दुबेच्या एनकाउंटरनंतर ट्विटरवर रोहित शेट्टी ट्रेंड, वाचा काय आहे कारण सोबतच अति दक्षिणवादी कट्टर संघटनेच्या संकेतस्थळावर कोरोना व्हायरसच्या महासाथीत जातीय अल्पसंख्यांकांची कोरोनामुळे होणारे मृत्यूची संख्या अधिक असल्याने आनंद साजरा केला जात आहे. कमिशन फॉर काऊंटरिंग एक्सट्रिमिस्ट यांचं म्हणणं आहे की या संघनांनी महासाथीला आपल्या एंजड्यासाठी वापर केला आहे. हे वाचा- विकास दुबेच्या एन्काऊंटरवर काँग्रेस नेत्यांनी साधला निशाणा, उपस्थित केला सवाल रेस्टॉरंट्समध्ये खाण्यावर 50 टक्के सूट दुसरीकडे, ब्रिटिश सरकारने रेस्टॉरंट उद्योगासाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. येथे ऑगस्टपर्यंत रेस्टॉरंटमध्ये खाणाऱ्यांना 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. यासाठी ‘ईट आउट टू हेल्प आऊट’ योजना सुरू केली आहे. ज्याचा हेतू रेस्टॉरंट उद्योगाला तोट्यापासून वाचवणे आणि रोजगार निर्माण करण्याचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







