लोकांच्या जीवाशी का खेळतोय चीन? आणखी एका देशाला पाठवले 60 हजार नकली मास्क

लोकांच्या जीवाशी का खेळतोय चीन? आणखी एका देशाला पाठवले 60 हजार नकली मास्क

याआधी स्पेन, नेदरलँड्स, झेक प्रजासत्ताक आणि तुर्की यांसारख्या देशांनाही चीनने खराब दर्जाचे मास्क पाठवले होते.

  • Share this:

टोरंटो, 09 एप्रिल : जगभरात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व देश या विषाणूला हरवण्यासाठी एकत्र लढत आहेत. मात्र अजूनही काही देशांमध्ये कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी वापरल्या जाणार्‍या उपकरणांचा अभाव आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय वस्तूंची प्रचंड कमतरता आहे. दरम्यान, चीनने बऱ्याच देशांना मास्क देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी कॅनडाला 60 हजाराहून अधिक मास्क पाठवले होते. मात्र यातील बहुतेक मास्क नकली असल्याचे समोर आले आहे.

चीनने पाठवलेल्या या नकली मास्कमुळे कॅनडामध्ये परिस्थिती बिघडली आहे. लोकांकडे मास्क नसल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कॅनेडियन सरकारने असा संशय व्यक्त केला आहे की, खराब मास्कमुळेच आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची लागण झाली. यासाठी कॅनडा सरकारने तपासाकरिता सुरुवात केली आहे. चीनने काही दिवसांपूर्वी टोरंटो येथील एका रुग्णालयात मास्क पाठवले होते.

वाचा-'आणखी मृतदेह नको असतील तर...', ट्रम्प यांच्या टीकेवर WHOचा पलटवार

कॅनडामधील या रुग्णालयातील मास्क फाडले जात आहे. इतकेच नाही तर स्पेन, नेदरलँड्स, झेक प्रजासत्ताक आणि तुर्की यांसारख्या देशांनाही चीनने खराब दर्जाचे मास्क पाठवले होते. कॅनडामधील सर्व ठिकाणांहून वाईट मुखवटे सापडल्याची माहिती मिळालेली नाही, मात्र टोरंटोमध्ये चीनने नकली मास्क पाठवल्याचे समोर आले आहे. कॅनडामध्ये सध्या 19 हजार 277 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 435 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-कोरोना रुग्णांची संख्या 5 हजार होईपर्यंत भारतात मृतांचा आकडा आहे सगळ्यात जास्त

चीनने पाठवलेल्या मास्कमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली?

मिळालेल्या माहितीनुसार सार्वजनिक सेवा मंत्री अनिता आनंद यांनी, ओटावाच्या खासगी कंपन्यांना आलेल्या सामनाची तपासणी करण्यास सांगितले गेले होते. एवढेच नाही तर सर्व आवश्यक वस्तू रुग्णालयात पाठवण्यापूर्वीच त्यांची तपासणीही केली पाहिजे. याआधी चीनने पाकिस्तानला अंडरविअरपासून तयार केलेले मास्क पाठवले होते. चीनने मास्क पाठवल्यानंतर टोरंटोमधील 10 केअर होममध्ये 19 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, सर्वत्र वेगवेगळे मास्क समोर आले आहेत, यामुळे चिंता वाढली आहे. शहराचे प्रवक्ते ब्रॅड रॉस यांनी, आम्ही मास्क परत करण्यासाठी तयार आहोत. विक्रेत्याने 2 लाख डॉलर्स परत देण्यास तयार आहे. चीनचा हा पहिला प्रकार नाही आहे. याआधीही चीनवर खराब मास्क पाठवल्याचा आरोप करण्यात आला होता.

वाचा-बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णालाही क्वारंटाइन आवश्यक; घरी कशी घ्यावी काळजी?

संकलन, संपादन-प्रियांका गावडे

First published: April 9, 2020, 9:33 AM IST

ताज्या बातम्या