मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

चीनने आपल्या मित्रालाच दिला धोका, पाकला दिले अंडरवेअरपासून बनवलेले मास्क; VIDEO VIRAL

चीनने आपल्या मित्रालाच दिला धोका, पाकला दिले अंडरवेअरपासून बनवलेले मास्क; VIDEO VIRAL

जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊन असताना केवळ चीनमध्ये मास्क तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र चीनने मास्कच्या नावावर आपला मित्र पाकिस्तानची फसवणूक केली आहे.

जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊन असताना केवळ चीनमध्ये मास्क तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र चीनने मास्कच्या नावावर आपला मित्र पाकिस्तानची फसवणूक केली आहे.

जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊन असताना केवळ चीनमध्ये मास्क तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र चीनने मास्कच्या नावावर आपला मित्र पाकिस्तानची फसवणूक केली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
इस्लामाबाद, 05 एप्रिल : जगभरात कोरोना विषाणू हा साथीचा रोग लोकांच्या जीवावर बेतला आहे. दिवसेंदिवस मृतांच्या संख्या वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, लोकांना सामाजिक अंतर राखण्याचा आणि तोंडावर मास्क लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे, बाजारपेठांमध्ये मास्कची मागणी झपाट्याने वाढली आहे. जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊन असताना केवळ चीनमध्ये मास्क तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे चीनकडून इतर देश मास्कची आयात करत आहेत. मात्र चीनने मास्कच्या नावावर आपला मित्र पाकिस्तानची फसवणूक केली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मास्कची मोठी मागणी आहे. हे लक्षात घेता पाकने चीनकडून मास्क विकत घेतले होते. मात्र हे मास्क अंडरवेअरपासून तयार केलेले होते, असे लक्षात आले आहे. पाकिस्तानचे लोक हे पाहून संतप्त झाले आहेत. पाकमधील वृत्त वाहिन्यांनी याचा खुलासा केला. त्यामुळे डॉक्टरांनीही मास्क वापरण्यास नकार दिला आहे. वाचा-अस्सलाम अलैकुम! 'आम्हाला तुमचा अभिमान', पाकने केले Air Indiaचे कौतुक जेव्हा चीनमध्ये बनविलेले मास्क पाकिस्तानमध्ये आणण्यात आले. तेव्हा हे एन-95 मास्क अंडरवेअरपासून तयार केलेले होते, असे लक्षात आले. त्यामुळे असे मास्क वापरण्यास डॉक्टरांनीही नकार दिला. वाचा-काळजात घर करेल असा PHOTO VIRAL, वाचा यामागची अंगावर शहारे आणणारी कहाणी China promised to send top quality N-95 masks to Pakistan. When the consignment landed, Pakistanis found that China had sent masks made of underwear. Pakistani anchor says “China ne Choona laga diya”. #ChineseVirusCorona pic.twitter.com/3H4Uo151ZJ वाचा-फळांवर थुंकी लावून विकणाऱ्याचा VIDEO व्हायरल, पोलिसांनी केली कडक कारवाई मुख्य म्हणजे पाकिस्तानव्यतिरिक्त, युरोपमधील बर्‍याच देशांनी चीनमधून पाठविलेले मुखवटे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार केली आहे. या कारणास्तव नेदरलँड्स आणि स्पेनने चीनकडून वैद्यकीय पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या संकटाच्या घडीला चीनने यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरानन खान यांना मदतीचे आश्वासन दिले होते. पण आता पाकिस्तानी लोक निकृष्ट दर्जाचे मुखवटे घेतल्यानंतर या आश्वासनाची चेष्टा करत आहेत. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी इमरान खान यांनी चीनचे कौतुक केले होते. मात्र अशा प्रकारानंतर चीन आणि पाक यांतील संबंध चिघळण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या