बीजिंग, 16 ऑक्टोबर : ज्या चीनमध्ये (China) सर्वात आधी कोरोनाव्हायरसचा (coronavirus) उद्रेक झाला त्या चीनच्या राष्ट्राध्यक्षांनाही (china president) आता कोरोनाव्हायरसची लागण झाली की काय अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे आणि यांचं कारण आहे ते म्हणजे शी जिनपिंग (Xi Jinping) यांचा हा व्हिडीओ. ज्यामध्ये ते एका कार्यक्रमात संपूर्ण भाषणात खोकताना (cough) दिसत आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग बुधवारी हाँगकाँगजवळील शेन्जेनमधील एका कार्यक्रमात आले होते. त्यांचं भाषण सुरू झालं, तेव्हा त्यांना खोकलाही सुरू झाला. संपूर्ण भाषणात ते खोक होते. त्यांना खोकल्याचा इतका त्रास होऊ लागला की त्यांना आपलं भाषण थांबवावंही लागलं. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांच्या आरोग्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
चीनच्या वृत्तवाहिनीवर जिनपिंग यांच्या भाषणाचे थेट प्रसारण सुरू होतं. express.co.uk च्या रिपोर्टनुसार ज्यावेळी जिनपिंग खोकताना दिसले. त्यावेळी ती दृश्यं हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ऑडिओमध्ये त्यांच्या खोकण्याचा आवाज सातत्याने येत असल्याचं ऐकायला मिळेल. शिवाय एका ठिकाणी शी जिनपिंग आपल्या तोंडावर हात ठेऊन खोकत असल्याचंही दिसून आलं. हा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला.
त्यांचा हा खोकल्याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता चर्चांना उधाण आलं आहे. जिनपिंग यांना कोव्हिड 19 ची लागण झाली नाही ना? अशी चर्चा सर्वत्र होत आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या कार्यक्रमात शी जिनपिंग यांनी सोशल डिस्टन्सिंग राखलं मात्र मास्क घातला नव्हता. मास्क न घालताच ते इतक्या लोकांसमोर संवाद साधत होते.
हे वाचा - कोरोना लशीचं ट्रायलं थांबणं ही चांगली बाब; तज्ज्ञ असं का म्हणतायेत?
सर्वात आधी कोरोनाची प्रकरणं समोर आली ती चीनमध्ये. वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आणि मग जगभर हा कोरोना पसरला. त्यामुळे यासाठी चीनला जबाबदार धरलं जातं आहे. मात्र चीनने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. जगभरात आधीच कोरोना पसरला होता आम्ही जगाला सावध केलं आणि आवश्यक ती पावलं उचलली असं चीनने म्हटलं आहे. जगभरात कोरोना पसरायला चीन जबाबदार नाही. ना हा व्हायरस चीनच्या लॅबमधून आला, ना चीनच्या मीट मार्केटमधून. उलट आम्ही सर्वात आधी जगाला सावध केलं, असा अजब दावा चीनने केला आहे.
हे वाचा - कोरोना लशीत रशियाने मारली बाजी! 2 महिन्यांत 2 लशींना परवानगी, तिसरी लसही तयार
चीनने बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळवलं आहे. 16 ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये 85,646 कोरोना रुग्ण आहेत. 4,634 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 80,759 रुग्ण बरे झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Coronavirus, Xi Jinping