लंडन, 11 मे : कोरोनानं जगात थैमान घातलं आहे. जगात कोरोना संक्रमित लोकांच्या संख्या 41 लाखांच्या घरात पोहचली आहे. तर, आतापर्यंत 2 लाख 82 हजार 495 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे, आतापर्यंत 14 लाख 02 हजार 882 लोकं निरोगी होऊन घरीही परतले आहे. एकीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. काही देश आता लॉकडाऊन शिथिल करण्याच्या विचारात असताना ब्रिटननं मात्र 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी याबाबत घोषणा केली. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सांगत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा बोरिय यांनी केली. यावेळी त्यांनी या काळात कोणतेही कठोर नियम राहणार नाहीत, असेही सांगितले. तसेच, पंतप्रधानांनी ‘स्टे होम’ ऐवजी ‘स्टे अलर्ट’ अशी घोषणा दिली आहे. 1 जुलैपासून सार्वजनिक ठिकाणे उघडली जातील. त्याच वेळी, 28 मे पर्यंत स्कॉटलंडमध्ये लॉकडाउन लागू होईल. वाचा- पुण्याचा आणखी एक विक्रम, NIVने तयार केली पहिली स्वदेशी Antibody टेस्ट किट ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले की स्टे अलर्ट सिस्टमद्वारे आम्ही संक्रमित व्यक्तींचा मागोवा घेऊ. जर कोणाला घरातून काम करायचे नसेल तर ते कार्यालयात जाऊ शकतो, परंतु सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे टाळा. बुधवारपासून लोकांना उद्यानात बसून व्यायामासाठी सोडता येईल. याशिवाय 1 जूनपर्यंत शाळा बंद राहतील. परदेशातून प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. वाचा- पाकिस्तानात महिलांकडून ब्लॅकमेलिंग; पुरुष झाले पीडित जॉर्जियामध्ये उद्योग-धंद्यांना परवानगी कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे जाहीर करण्यात आला असला तरी, आता अनेक देशांमध्ये निर्बंध शिथिल केले जात आहेत. अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये अनावश्यक उद्योगांना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. युरोपियन देश नॉर्वेमध्ये शाळा उघडल्या आहेत. त्याचवेळी न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी कोरोनावर विजय घोषित केला आहे. येथे लॉकडाउन टप्प्याटप्प्याने केले जात आहे. युरोपमधील अन्य काही देशही हळूहळू लॉकडाऊन शिथिल करण्याच्या विचारात आहेत. वाचा- पुण्यात 69 भागात लागू होणार 7 दिवसांचं टोटल लॉकडाऊन, ही आहेत शहरं भारतात 17 मेपर्यंत लॉकडाऊन दरम्यान भारतात 3 मेपर्यंत पुन्हा 2 आठवड्यांसाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. त्यामुळं 17 मेपर्यंत सध्या लॉकडाऊनचा कालावधी आहे. या काळात देशातील जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करून त्याप्रमाणे नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र भारतात कोरोनाची 62 हजार 939 प्रकरणे असल्यामुळं लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवला जाऊ शकतो. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.