Home /News /pune /

पुण्यात 69 भागात लागू होणार 7 दिवसांचं टोटल लॉकडाऊन, ही आहेत शहरं

पुण्यात 69 भागात लागू होणार 7 दिवसांचं टोटल लॉकडाऊन, ही आहेत शहरं

पुण्यातील कोणत्या भागात उद्यापासून 7 दिवसांचं टोटल लॉकडाऊन लागू होणार? पुण्यातील 'ते' 69 संक्रमित झोन कोणते ?

पुणे, 10 मे : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे पुण्यात सोमवारपासून काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. पुण्यात उद्यापासून अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्व दुकानांवर बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश आयुक्तांकडून देण्यात आले आहे. इतकंच नाही तर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी काही वेळाही ठरवण्यात आल्या आहे. नियमांचं पालन करण्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आदेश आयुक्तांकडून देण्यात आले आहे. रेड झोन असलेल्या पुण्यामध्ये एकूण 69 कंटेनमेंट झोन्स आहेत. या भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे दवाखाने वगळता इतर दुकाने बंद राहणार असल्याचा निर्णय आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. भाजीपाला, दूध हे पोलिसांच्या सहकार्यानं मोकळ्या मैदानात द्यायचा विचार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पुणेकरांना सोमवारपासून कठोर नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 पर्यंत दुकानं उघडी राहतील असे निर्देश देण्यात आले आहेत. पुण्यातील कोणत्या भागात उद्यापासून 7 दिवसांचं टोटल लॉकडाऊन लागू होणार? पुण्यातील 'ते' 69 संक्रमित झोन कोणते ? पुणे शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राची नावे : मंगळवार पेठ, जूना बाजार, पर्वती दर्शन परिसर १, २, पर्वती चाळ क्र. ५२ झोपडपट्टी, पर्वती दांडेकर पूल झोपडपट्टी, पर्वती दत्तवाडी, पर्वती इंदिरानगर झोपडपट्टी नीलामय टॉकीज १, २, शहर मध्यवर्ती भाग कसबा, नाना भवानी पेठ, कोंढवा बुद्रुक, काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक, नॉटिंग हिल सोसायटी, उंड्री, होलेवस्ती, कात्रज, सुखसागरनगर, अंबामाता मंदिर परिसर, कोथरूड, शिवतारा इमारत बधाई स्वीटजवळ, कोथरूड चंद्रगुप्त सोसायटी, महाराज कॉम्प्लेक्स मार्ग, पुणे स्टेशन, ताडीवाला रस्ता, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दक्षिणेकडील वसाहत, घोरपडी, बालाजीनगर, विकासनगर, पर्वती, तळजाई वस्ती १, २, धनकवडी, बालाजीनगर, पर्वती शिवदर्शन १, २, धनकवडी, गुलाबनगर चैतन्यनगर, आंबेगाव खुर्द जांभूळवाडी, साईसमृध्दी परिसर, वडगावशेरी, गणेशनगर, रामनगर, टेम्पो चौक, लोहगाव, कालवडवस्ती, बिबवेवाडी, आंबेडकरनगर, मार्केट यार्ड, गुलटेकडी, डायसप्लॉट, मीनाताई ठाकरेनगर, बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी स. नं. ६५०, गुलटेकडी, सेव्हन डे अ‍ॅडव्हेंटीज मिशन, बिबवेवाडी, ढोलेमळा झोपडपट्टी, प्रेमनगर झोपडपट्टी, येरवडा गांधीनगर, गांधीनगर २, ताडीगुत्ता, नागपूर चाळ, आदर्श इंदिरानगर, आळंदी रस्ता, फुलेनगर, आळंदी रोड, कळस, जाधववस्ती, येरवडा प्रभाग क्र. ६, हडपसर रामनगर, रामटेकडी, गोसावीवस्ती, वैदूवाडी, हडपसर सय्यदनगर १, २, ३, गुलामअलीनगर, कोंढवा खुर्द शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, तांबोळी बाजार, कोंढवा खुर्द मिठानगर, वानवडी एसआरपीएफ, शिवाजीनगर कामगार पुतळा, महात्मा गांधी झोपडपट्टी, पाटील इस्टेट, शिवाजीनगर रेल्वे लाइन उत्तरेकडील बाजू, शिवाजीनगर न. ता. वाडी, कामगार आयुक्त कार्यालयालगतची झोपडपट्टी, कॉँग्रेसभवन पाठीमागील बाजू, हडपसर चिंतामणीनगर, रेल्वे गेटजवळ, हडपसर आदर्श कॉलनी, वेताळनगर, सातववाडी, हडपसर माळवाडी, हांडेवाडी रस्ता, इंदिरानगर. संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:

पुढील बातम्या