'ड्रॅगन'चा नवा प्लॅन आला जगासमोर, असा रचला डाव!

'ड्रॅगन'चा नवा प्लॅन आला जगासमोर, असा रचला डाव!

चीनच्या साम्राज्यवादी आणि जमीनपिपासू वृत्तीची जगाला चांगलीच ओळख आहे. मात्र, आता चीनचं आता चीनला समुद्र खुणावत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 जून : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. अनेक देशांनी या व्हायरसमुळे हात टेकले आहे. ज्या चीनमधून या कोरोनाचा उद्रेक झाला. त्या चीनच्या लष्करी कुरघोड्या अजूनही सुरूच आहे.  चीनचा हिंद महासागरावर कब्जा मिळवण्याचा प्लॅन जगासमोर आला आहे. पाकिस्तानातल्या ग्वादर बंदरावर नजर ठेवून चीननं भयानक चाल रचली आहे.

चीनच्या साम्राज्यवादी आणि जमीनपिपासू वृत्तीची जगाला चांगलीच ओळख आहे. मात्र, आता चीनचं आता चीनला समुद्र खुणावत आहे. CPEC च्या माध्यमातून चीनचा हिंद महासागरात दबदबा वाढवण्याचा हेतू आहे. चीनचा हेतू सॅटेलाईट कॅमेऱ्यामुळे उघड झाला. फोर्ब्समध्ये छापलेल्या बातमीनुसार, ग्वादर बंदरचा विकास करण्याच्या नावाखाली चीनचा हिंद महासागरावर कब्जा मिळवण्याचा डाव आहे.

सॅटेलाईटनं घेतलेल्या फोटोवरून, चीनचा नेव्ही बेस तयार करण्याचा हेतू असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यासाठी तिथं मोठी सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे. मोठे सिक्युरिटी टॉवरही बांधण्यात आले आहे.  चीनच्या सैनिकांसाठी दोन वेगळ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. हा बेस चीनमधली 'चायना कम्युनिकेशन कन्स्ट्रक्शन कंपनी' विकसीत करत आहे.

प्रशांत महासागरात चीन अमेरिकेला टक्कर देण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर इकडे हिंद महासागरात चीनचा प्लॅन भारत कमजोर करत आहे. चीनचा साऊथ चायना सी वर डोळा असल्याचं लपून राहिलेलं नाही. चीननं साऊथ चायनाच्या सात द्विपांना मिलिट्री बेटांमध्ये रूपांतरीत केले आहे.

हेही वाचा - अबब! हँडपंपमधून निघालं 8 किलो सोनं, पोलिसही गेले चक्रावून

साम्राज्यवादी चीनला आता जगातल्या समुद्रांवरही वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. त्यामुळे आपली ताकद वाढवून इतर देशांवर दबाव निर्माण करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्या कटात भारत आणि अमेरिकेला गुंतवण्याचा चीनचा डाव आहे. मात्र, चीनचा हा डाव सर्व जगाच्या लक्षात आल्यानं जगातले देश भारत आणि अमेरिकेच्या नेतृत्वात एकत्र येत आहेत.

First published: June 7, 2020, 4:49 PM IST
Tags: chinaindia

ताज्या बातम्या