Home /News /crime /

अबब! हँडपंपमधून निघालं 8 किलो सोनं, पोलिसही गेले चक्रावून

अबब! हँडपंपमधून निघालं 8 किलो सोनं, पोलिसही गेले चक्रावून

सोन्यासोबतच घरातून दोन पिस्तुलं, 10 काडतुसं, 5 किलो गांजा आणि दीड लाख रुपयेही पोलिसांनी जप्त केले.

    वैशाली 7 जून: बिहारमधल्या वैशालीमध्ये पोलिसांनी सोनं लुटणाऱ्या टोळीला अखेर जेरबंद केलं. गेली अनेक महिने या टोळीचा तपास सुरू होता. मात्र ते हाती लागत नव्हते. या टोळीच्या घरामधून पोलिसांनी जो मुद्देमाल जप्त केला तो पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. मुख्य आरोपीच्या घरातल्या हँडपंपमधून पाणी नाही तर चक्क सोनं निघालं आणि तेही तब्बल 8 किलो. या घटनेची सर्व राज्यात चर्चा सुरू आहे. मागच्या वर्षी 23 नोव्हेंबरला या लुटारुंनी स्थानिक मुथ्थुट फायनान्समधून तब्बल 51 किलो सोनं लुटून नेलं. दिवसा ढवळ्या त्यांनी हे सोनं लुटल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी खास पथकं स्थापन केली होती. तेव्हापासून तपास सुरू होता. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापे घालून धर्मेंद्र राय उर्फ धर्मेंद्र गोप आणि वीरेंद्र शर्मा यांना अटक केली. रायच्या घरी छापा घातल्यानंतर पोलिसांनी जेव्हा शोध मोहीम सुरू केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. घरात असलेल्या हँडपंपची जेव्हा पोलिसांनी तपासणी केली तेव्हा त्या पंपामधून सोनच सोनं निघालं. त्या पंपमधून 8 किलो सोनं निघाल्याने पोलिसही आश्चर्यचकीत झाले. कोरोनाबाधित 82 वर्षांची आजी हॉस्पिटलमधून गायब; प्रशासनाची वाढली डोकेदुखी सोन्यासोबतच घरातून दोन पिस्तुलं, 10 काडतुसं, 5 किलो गांजा आणि दीड लाख रुपयेही पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी राय यांच्या कुटुंबातल्या काही लोकांनाही अटक केलीय. लुटलेलं सामान लपविण्याच्या कटात सहभागी असल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. हेही वाचा - गूड न्यूज! कोरोनाव्हायरसविरोधात औषध सापडलं; भारतातील शास्त्रज्ञांचा दावा गेल्या 80 दिवसात पहिल्यांदा पेट्रोल-डिजेलच्या किमतीत झाली वाढ; काय आहेत नवीन दर?
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: क्राइम, बिहार

    पुढील बातम्या