बीजिंग, 22 एप्रिल : चीनच्या वुहानपासून चार महिन्यांआधी कोरोनाचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. याच कोरोनामुळे आता जगभरात हाहाकार माजला आहे. तर, चीनमध्ये लॉकडाऊन हटवण्यात आला आहे. चीनमधील परिस्थिती आधीच्या तुलनेत चांगली आहे. यामुळे, काही महत्त्वपूर्ण कामं हळूहळू सुरू करता यावेत यासाठी चिनी सरकारने लॉकडाऊन हटवला आहे. दरम्यान, लॉकडाऊननंतर चीनने उपद्व्याप सुरू केले आहेत. चीनमधील एका कारखान्यामध्ये अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चीनमधील कारखान्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे नाव होते, किंसिंग स्पर्धा. . या किसिंग स्पर्धेचे फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. दुसरीकडे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. असे सांगितले जात आहे की चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, चीन सरकारने लॉकडाऊन रद्द केला. त्याअंतर्गत, चीनमधील सूझौ शहरातील एक कारखाना पुन्हा सुरू करताना कर्मचार्यांनी विचित्र पद्धतीने उत्सव साजरा केला. त्यांनी किसिंग स्पर्धा आयोजित केली ज्यात कर्मचारी एकमेकांना चुंबन घेताना दिसले. मात्र, यावेळी कर्मचार्यांमध्ये आरसा ठेवण्यात आला होता. वाचा- बंद हॉटेलमध्ये बसला लपून, 4 दिवसात संपवल्या 70 दारूच्या बाटल्या मात्र हे फोटो व्हायरल झाल्यानंतर या स्पर्धेला ट्रोल करत अनेकांनी टीका केल्या आहेत. बरेच लोक म्हणतात की चिनी सरकारने योग्य अंतर राखण्याच्या अटीवर लॉकडाऊन रद्द केला होता, मात्र या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.
वाचा- लॉकडाऊनचा कंटाळा बघा! बोअर झाला म्हणून 15 कोटी कमवणारा अवलिया झाला डिलिव्हरी बॉय ग्लोबल टाईम्सचे म्हणणे आहे की ही, किसिंग स्पर्धा लोकांचे स्वागत आणि उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने ठेवली गेली. या प्रकरणात, कारखाना मालक मा म्हणताच की, किसिंग स्पर्धा दरम्यान कोणतेही नियम मोडले नाही. आम्ही स्पर्धकांमध्ये आरसा ठेवला होता. वाचा- VIDEO : लॉकडाऊनला कंटाळून रस्त्यावर आली महिला, पोलीस येताच काढले कपडे आणि… कारखान्याच्या मालकाने स्पष्टीकरण दिले की सहभागी झालेल्यांपैकी काही जण फॅक्टरीत काम करणारे विवाहित जोडपे होते. या साथीच्या आजारामुळे बर्याच लोकांना प्रचंड तणावाचा सामना करावा लागला आणि त्यांना आनंद देण्यासाठी ‘किसिंग कॉन्टेस्ट’ आयोजित केली होती.