Home /News /videsh /

जगात दहशत पसरवणारा 'तो' चिनी व्हायरस आला सापातून? 2 शहरं पूर्णपणे बंद

जगात दहशत पसरवणारा 'तो' चिनी व्हायरस आला सापातून? 2 शहरं पूर्णपणे बंद

Pic Credic - Reuters

Pic Credic - Reuters

जगात सध्या सर्वात जास्त दहशत सध्या कुणी पसरवली असेल कोरोना व्हायरसने. चीनमध्ये या व्हायरसमुळे 17 बळी घेतलेत. या देशाने दोन शहरं पूर्णपणे बंद ठेवली आहेण्यात आलीत. हा वायरस सापापासून आल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.

  बीजिंग, 23 जानेवारी : जगातली दोन महत्त्वाची शहरं कालपासून पूर्णपणे ठप्प आहेत. ना तिथं कोणी जाऊ शकत, ना तिथून कोणी बाहेर पडू शकत... कारण या शहराला एका भयानक व्हायरसे विळखा घातला आहे. चीनच्या वुहान (Wuhan) आणि हुआंगगॅंग (Huanggang)शहरांबद्दलचं हे सत्य आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरस (corona virus ) बद्दल तुम्ही एव्हाना ऐकलं असेल. या विषाणूला उतारा सापडलेला नाही आणि आतापर्यंत 17 जणांचा बळी या भलत्याच आजाराने घेतला आहे. 600 पेक्षा अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. वुहान आणि हुआंगगँग या दोन शहरांमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही शहरं बंद ठेवली आहेत. या व्हायरसचा उगम सापामुळे झालाय, असा धक्कादायक खुलासा याबाबत नुकताच झाला आहे. हा सापाचा व्हायरस डिसेंबर 2019 मध्ये अचानक आला आणि त्याने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. चीनमधून इतरत्रही तो पसरला आहे. भारतानेही चीनमधून येणाऱ्या प्रवाशांचं विमानतळावरच स्क्रीनिंग करायचं ठरवलं आहे. सापामुळे पसरला व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चीनने ही शहरं बंद ठेवली असली, तरी या व्हायरसला लगाम घालण्यासाठी तो नेमका आला कुठून याचा शोध घेणं सुरू झालं आणि संशोधकांना अखेर धागा सापडलाच...कोरोना व्हायरसचा मूळ स्रोत साप असू शकतो, असा अंदाज संशोधकांनी आपल्या अभ्यासानंतर व्यक्त केला आहे. नवीन कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण स्थानिक सीफूड होलसेल मार्केटमधील कामगार किंवा ग्राहक आहेत. चीनमध्ये काही ठिकाणी जिवंत प्राण्यांची विक्री केली जाते, तिथे या व्हायरसची लागण झाली. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या या रुग्णांच्या शरीरातील व्हायरसचे नमुने वैज्ञानिकांनी तपासले आणि व्हायरस आणि इतर प्राण्यांच्या जेनेटिक आणि प्रोटिन कोडची तपासणी केली, तेव्हा तो सापाच्या जेनेटिक आणि प्रोटिन कोडशी मिळताजुळता असल्याचं दिसून आलं. Journal of Medical Virology मध्ये  संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. कोरोना हा काय प्रकार आहे? वुहानमध्ये जिथं या व्हायरसचा प्रसार सर्वाधिक झाला त्या परिसरातील चायनीज क्रेट Chinese krait आणि चायनीज कोब्रा Chinese cobra हे या व्हायरसचे सोर्स असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. कोरोना वायरस हे नाव व्हायरसच्या आकारावरून पडलं आहे. एखाद्या मुकुटाप्रमाणे, प्रभेसारखा दिसणारा हा व्हायरस आहे आणि तो हवेमार्फत पसरतो.  श्वसनप्रणाली आणि गॅस्ट्रोइन्टेस्टाइनवर परिणाम करतो.  याआधी severe acute respiratory syndrome corona virus (SARS-CoV) आणि Middle East respiratory syndrome corona virus (MERS-CoV) यांनी गेल्या 17 वर्षात शेकडो लोकांचे बळी घेतलेत.  जागतिक आरोग्य संघटनेने चीनमधील या कोरोना व्हायरसला 2019-nCoVअसं नाव दिलं आहे. MERS-CoV आणि SARS-CoV या कोरोना व्हायरसला झोनोटिक व्हायरल डिसीज म्हटलं जातं (zoonotic viral diseases) एखाद्या व्यक्तीला या आजाराची लागण थेट प्राण्यांमार्फत होते. मात्र नवीन क्रोनोव्हायरस व्यक्ती व्यक्तींमध्ये पसरत आहे, त्यामुळे गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे. भारतात स्क्रीनिंग सुरू भारतात हा व्हायरस येऊ नये म्हणून केंद्र सरकारने पुरपूर काळजी घेतली आहे. चीनमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी केली जाते आहे. शिवाय चीनमधील भारतीय नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
  अन्य बातम्या ऐकावं ते नवलच! चक्क माशांच्या कातडीपासून इथे तयार होतात कपडे ...आणि तिने पतीलाच विकण्याची फेसबुकवर केली जाहिरात, कारण ऐकून झोप उडेल
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: China, Health, Virus

  पुढील बातम्या