मुजफ्फरनगर, 25 जून: उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये पतीच्या आंबटशौकिन स्वभावामुळे संतापलेल्या पत्नीने खळबळजनक प्रकार केला आहे. भौराकला पोलीस ठाणे हद्दीत शिकारपूर गावात राहणाऱ्या महिलेने केलेले कृत्य पाहून गावकऱ्यांना धक्काच बसला आहे. या महिलेने तिचा पती झोपलेला असताना त्याचं प्रायव्हेट पार्ट कापलं. इतकच नाही तर पतीचं लिंग कापल्यानंतर त्याला मारहाण केली. यात पतीचा मृत्यू झाला. सांगितलं जात आहे की, पती आंबटशौकिन असल्याकारणाने पत्नी वैतागली होती. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. (wife cut off genitals while husband was asleep then beat him to death)
काय आहे प्रकरणं?
शिकारपूर गावातील वकील रफीक अहमद आपल्या घरात मृत अवस्थेत पडले होते. कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांना सूचना दिली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविल्यानंतर धक्कादायक खुलासा झाला. यावेळी रफिक याचं गुप्तांग कापलेल्या अवस्थेत होते. पोलिसांना मृत व्यक्तीची पत्नी हाजरावर शंका आली, त्यांनी तिला ताब्यात घेतलं व चौकशी सुरू केली.
हे ही वाचा-नागपुर हत्याकांडाची मोठी अपडेट; मुलांची करणार DNA चाचणी, महत्त्वाचा खुलासा
चौकशीदरम्यान झाला खुलासा
पोलिसांच्या चौकशीदरम्यान हाजराने पोलिसांना सांगितलं की, वकिलसोबत तिचं लग्न झालं होतं. मात्र त्यांनी एका बिहारी तरुणीशी दुसरं लग्न केलं होतं. ती काही दिवसांपूर्वी पतीला सोडून निघून गेली होती. त्यानंतर मात्र वकिलाने तिसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेव्हा तिने याचा विरोध केला तेव्हा वकिल तिला मारहाण करू लागले. यामुळे वैतागून मगिलेने वकिल झोपलेले असताना त्यांचं गुप्तांग कापलं. त्यानंतर त्यांना इतकं मारलं की त्यातच त्यांनी जीव सोडला.
काय आहे अधिकाऱ्यांचं म्हणणं..
महिलेने लिंगपिसाट पतीला वैतागून त्याची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. पती झोपलेला असताना तिने प्रथम त्याचं गुप्तांग कापलं. त्यानंतर त्याला मारून टाकलं. या प्रकरणात महिलेला अटक करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, PRIVATE part, Wife and husband