• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • वकिलाच्या प्रत्येक प्रश्नावर आरोपी म्हणायचा म्याऊ म्याऊ! न्यायाधीश वैतागले आणि...

वकिलाच्या प्रत्येक प्रश्नावर आरोपी म्हणायचा म्याऊ म्याऊ! न्यायाधीश वैतागले आणि...

वकिलांच्या प्रत्येक (Cat man answering every question with myav myav sound) प्रश्नावर एक आरोपी केवळ ‘म्याऊ म्याऊ’ एवढंच उत्तर देत होता.

 • Share this:
  बुएनोस आयरिस, 27 ऑक्टोबर : वकिलांच्या प्रत्येक (Cat man answering every question with myav myav sound) प्रश्नावर एक आरोपी केवळ ‘म्याऊ म्याऊ’ एवढंच उत्तर देत होता. खुनाच्या या खटल्यातील आरोपीच्या (Cat man discussion on social media) वर्तणुकीची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. साधारणतः गंभीर गुन्ह्यांतील आरोपीदेखील जेव्हा न्यायालयासमोर उभे राहतात, तेव्हा स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि न्यायाधीशांना सहानुभूती वाटण्यासाठी नम्रतेने वागण्याचा प्रयत्न करतात. मात्र एक (Cat lover accused) आरोपी असा आहे ज्याला स्वतःच्या जिवाचीही पर्वा नसल्यामुळे तो कुणालाच जुमानत नाही. प्रत्येक प्रश्नावर म्याऊ म्याऊ अर्जेंटिनातील एका खुनाच्या खटल्यातील आरोपी निकोलस गिल हा दुहेरी हत्येच्या आरोपाखाली अटकेत आहे. या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी त्याला काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र कुठल्याही प्रश्नाचं उतर न देता त्याने केवळ म्याऊ म्याऊ एवढीच बडबड सुरू ठेवली. वकिलांनी काहीही प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर ठरलेलं असायचं. ते उत्तर होतं म्याऊ म्याऊ.  वकिलांचे प्रश्न तो शांतपणे ऐकून घ्यायचा, मात्र त्याला उत्तर देण्याची वेळ आली की म्याऊ म्याऊ करायचा. या प्रकारानं वैतागलेल्या न्यायाधीशांनी त्याला न्यायालयातून हाकलून दिलं. काय आहे प्रकरण? निकोलस हा मूळचा इस्रायलचा रहिवासी आहे. 2019 साली तो इस्रायलवरून आपली आई आणि मावशीसोबत अर्जेंटिनाला आला होता. तिथे त्याने दोघींचीही हत्या केली. या हत्येप्रकरणी त्याला 2019 सालीच अटक करण्यात आली असून त्याच्यावर खटला चालवण्यात येत आहे. हे वाचा- अवघ्या 24 व्या वर्षी झाली 21 मुलांची आई, असा करते मुलांचा सांभाळ; पाहा PHOTOs कॅट मॅन अशी ओळख कोर्टात सतत म्याऊ म्याऊ करत असल्यामुळे त्याची ओळख कॅट मॅन अशी झाली आहे. खून केल्यानंतर जेव्हा त्याला अटक करण्यात आली, तेव्हा त्याच्या घरात अनेक मांजरी असल्याचं पोलिसांना आढळून आलं होतं. निकोलसची मानसिक अवस्था ठिक नसल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी त्याला वेड्यांच्या इस्पितळात दाखल केलं. तिथे आपल्यासोबत आपल्या मांजरींना ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली होती. मात्र ही मागणी फेटाळून लावण्यात आली होती. त्याचा परिणाम निकोलसच्या मनावर झाला असावा, असं काहीजणांचं म्हणणं आहे. तर काहीजणांच्या मते शिक्षेतून सूट मिळण्यासाठी तो मानसिक रुग्ण असल्याचं नाटक करत आहे.
  Published by:desk news
  First published: