Home /News /videsh /

माणसाला भेटला जगातील सर्वात खतरनाक पक्षी, लाथ मारून करतो काम तमाम

माणसाला भेटला जगातील सर्वात खतरनाक पक्षी, लाथ मारून करतो काम तमाम

जगातील सर्वात खतरनाक पक्षी समोर आल्यामुळे आपली कशी भंबेरी उडाली, याचा अनुभव (Cassowary bird is most dangerous bird in the world) एकाने शेअर केला आहे.

    मेलबर्न, 2 डिसेंबर: जगातील सर्वात खतरनाक पक्षी समोर आल्यामुळे आपली कशी भंबेरी उडाली, याचा अनुभव (Cassowary bird is most dangerous bird in the world) एकाने शेअर केला आहे. माणसांना साधारणपणे जंगली (Fear of wild animals) प्राण्यांची भीती वाटते. हिंस्र प्राणी आपल्यावर (Attack by animals) हल्ला करणार नाहीत, याची काळजी माणसं सतत घेत असतात. प्राण्यांएवढी कुठल्याच पक्ष्याची भीती माणसांना वाटत नाही. मात्र जगात असा एक पक्षी आहे, ज्याची भीती त्याच्याविषयी माहिती असणाऱ्या प्रत्येकाला वाटते. सर्वात धोकादायक पक्षी कैसोवैरी नावाचा पक्षी हा जगातील सर्वात भयंकर पक्षी असल्याचं मानलं जातं. हा पक्षी साधारण सव्वा सहा फुटांपर्यंत उंच असतो आणि त्याचं वजन 70 किलोच्या आसपास असतं. हा पक्षी ज्याच्या जवळ येऊन उभा राहिल, ती व्यक्ती केवळ आपल्या सुरक्षेसाठी प्रार्थना करण्यावाचून काहीच करू शकत नाही. ऑस्ट्रेलियात अनेक ठिकाणी हा पक्षी आढळतो. काम करताना आला पक्षी ऑस्ट्रेलियातील नॉर्थ क्विसलँड भागात हा पक्षी एका सुतारकाम करणाऱ्या व्यक्तीपाशी येऊन बसला. टोनी फ्लेमिंग नावाचा कलाकार त्याच्या दुकानात काम करत होता. त्याच्यासोबत आणखी काही कलाकार काम करत होते. त्यावेळी अचानक कैसोवैरी तिथं आला आणि दुकानाचं निरीक्षण करू लागला. या पक्षाविषयी माहिती असल्यामुळे टोनी यांनी काहीच हालचाल केली नाही. शांतपणे पक्षी काय करतो, ते पाहत राहिले. काही वेळ दुकानातील शोभेच्या वस्तूंकडे त्याने पाहिलं आणि तिथून काढता पाय घेतला. आपल्यावर किंवा दुकानातील वस्तूंवर त्याने हल्ला न केल्याबद्दल सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. हल्ल्यात होतो मृत्यू काही दिवसांपूर्वी कैसोवैरी पक्षानं एका नागरिकाला जोरदार लाथ मारली होती. त्या लाथेनं घायाळ झालेल्या व्यक्तीला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. हे वाचा- फक्त ख्रिसमसच्या रात्री ‘संस्कारी प्रेमिका’ देते धोका, मग वर्षभर राहते एकनिष्ठ लोक देतात अन्न जेव्हा जेव्हा हा पक्षी दुकानाच्या परिसरात येतो, तेव्हा त्याने आपल्यावर हल्ला करू नये किंवा भूकेमुळे आक्रमक होऊ नये, यासाठी त्याला अन्न देऊ करतात. पोट भरल्यामुळे हा पक्षी अन्न खाऊन निघून जातो. ऑस्ट्रेलियात हा पक्षी पाळण्यासाठी विशेष परवानगी घेण्याची गरज असते.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Attack, Australia, Wild animal

    पुढील बातम्या