लंडन, 2 डिसेंबर: वर्षभर आपल्या पार्टनरसोबत एकनिष्ठ राहून केवळ ख्रिसमसच्या रात्री धोका (Story of a woman who cheats boyfriend only on the day of Christmas) देणाऱ्या तरुणीची कहाणी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एकमेकांवर असणारं प्रेम आणि विश्वास (Trust and Love are base of relationship) हाच प्रत्येक नात्याचा पाया असतो. जर विश्वासाला तडा गेला, तर नातं संपायला सुरुवात होते. मात्र अनेकजण आपल्या जोडीदाराला सोडून दुसऱ्या पार्टनरसोबत मजामस्ती करण्याची संधी (Romance with other partners) शोधताना वाट्टेल ती कारणं सांगत असतात. असंच एका कारण सोशल मीडियावरून एका तरुणीनं जाहीर केलं आहे.
ख्रिसमसदिवशी देते धोका
लंडनमध्ये राहणारी आणि व्यवसायानं ट्रॅव्हल एजंट असणारी सुजी ही तरूणी नाताळच्या दिवशी आपल्याला काय होतं, तेच कळत नसल्याचं सांगते. वर्षभर मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत एकनिष्ठ असते, मात्र ख्रिसमसदिवशी सांताक्लॉजला पाहिलं की आपल्या मनावरचा ताबा सुटतो आणि आपण काय करतोय, याचं भानच राहत नाही, असा अनुभव तिने सोशल मीडियावरून शेअर केला आहे. या काळात आपण आपल्या पार्टनरला धोका देत आहोत, याची जाणीवही आपल्याला राहत नाही आणि आपण केवळ एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असतो, असं सुजी म्हणते.
पार्टी करण्याची हौस
सुजीला पार्टी करण्याची प्रचंड आवड आहे. दरवर्षी नाताळच्या दिवशी ती मित्रांसोबत पार्टीला जाते. तिथं कुठून का कुठून एखादा सांताक्लॉज येतो आणि त्याला पाहिलं की आपण बेभान होतो, असं सुजी म्हणते. अशा परिस्थितीत आपण प्रियकर सोडून इतर कुणाशीही रोमान्स करायला सुरुवात करतो आणि आपण काय करतोय, याचं भान आपल्याला राहत नसल्याचा अनुभव तिनं सोशल मीडियावरून शेअर केला आहे.
हे वाचा- VIDEO गैरसमजूतीतून इराणी सैनिक आणि तालिबानी सैनिक यांच्यात हिंसक संघर्ष
यंदा करणार डबल धमाल
गेल्या वर्षी कोरोनामुळे ख्रिसमसची पार्टी होऊ शकली नव्हती. त्यामुळे या वर्षीच्या पार्टीची आपण जोरदार तयारी केली असून गेल्या वर्षीची पूर्ण कसर भरून काढण्याचा इरादा तिने व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boyfriend, Girlfriend, London, Love story