जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / California Firing Video : अमेरिकेतील भीषण गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, 9 जखमी

California Firing Video : अमेरिकेतील भीषण गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, 9 जखमी

California Firing Video : अमेरिकेतील भीषण गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, 9 जखमी

या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून यात लोक एकमेकांचा गळा दाबताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 3 एप्रिल : अमेरिकेतील (America News) कॅलिफोर्निया राज्याची राजधानी सॅक्रामेंटोंमध्ये एका गर्दीच्या भागात झालेल्या गोळीबारात (Firing in US) सहा जणांचा मृत्यू झाला असून 9 जणं जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी या घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी गोळीबार झाला. या गोळीबारात तब्बल 15 जणं जखमी झाल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये लोक रस्त्यावरुन धावताना दिसत होते. तर बॅकग्राऊंडमध्ये गोळीबाराचा आवाज येत होता. व्हिडीओमध्ये घटनास्थळी रुग्णवाहिका जाताना दिसत आहे. पोलिसांनी घटनेबाबत माहिती दिली. व्हिडीओमध्ये मारहारण करताना दिसले लोक… अमेरिकेत वारंवार गोळीबाराच्या घटना समोर येतात. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून 9 जणं जखमी झाले आहेत. ही एक मोठी घटना आहे. तर दुसऱ्या एका ट्विटरवरील व्हिडीओमध्ये लोक एकमेकांना गळा दाबताना दिसत आहे आणि एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. यादरम्यान काही जणं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. या व्हिडीओच्या बॅकराऊंडमध्ये गोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. हे ही वाचा- ‘तुम्ही महिला असाल तर तिथे विशेष काळजी घ्या, कारण…’; अमेरिकेनं भारतात येणाऱ्या नागरिकांना दिला सल्ला यापूर्वी गुरुवारी घरगुती वाद सोडवण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांनी एका अधिकाऱ्यांचा गोळीबारात मृत्यू झाला. याशिवाय दोन अन्य अधिकारीही जखमी झाले होते. लेबनानमधअये मेअर शेरी कॅपेलोने सांगितलं की, गोळीबाराची सूचना मिळाल्यानंतर दुपारी साधारण साडे तीन वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचली. तेथे तीन अधिकारी जखी झाले होते, पैकी एकाचा मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात